मुंबई, दि. 10 जानेवारी 2024 | सर्वोच्च न्यायालयाने यांनी केलेले एक निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बदलले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती योग्य ठरवली. यामुळे त्यांनी बजावलेले व्हिप योग्य होते, असे म्हटले आहे. शिंदे यांच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही. ते आमदार अपात्र करण्याची मागणी फेटाळली. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती मान्य केल्यामुळे त्यांचे व्हिप लागू होणार आहे. यापूर्वी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली होती. भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाने निकाल देताना म्हटले होते.
शिवसेनेच्या घटनेनुसार एकट्या ठाकरे यांना सर्व निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांची केलेली हकालपट्टी मान्य करता येत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख गटनेत्याला पदावरुन काढू शकत नाही. राष्ट्रीय कार्यकारणीतील नेत्यांसोबत ते निर्णय घेऊ शकतात. पक्ष प्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतिम राहणार आहे. यामुळे पक्ष प्रमुखाचा निर्णय अंतिम हे मान्य करता येत नाही. २०१८ मध्ये केलेली पदरचना आणि घटनेतील बदल मान्य करता येणार नाही. शिवसेनेची १९९९ मधील घटनाच मान्य करता येणार आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. तसेच प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली. गोगावले यांची नियुक्ती योग्य असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले. यामुळे त्यांनी बजावलेला व्हिप देखील योग्य आहे.
शिवसेना शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरले आहे. एकाही आमदारस अपात्र करता येणार नाही. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सरकारला कोणताही धोका नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहे. विधिमंडळात बहुमत शिंदे यांच्या गटाला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष गेल्याचे आता स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. आता उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.