मुंबई : 5 जुलै 2021ला भाजपा(BJP)च्या 12 आमदारांनी केलेला हा गदारोळ. याच 12 आमदारांना सुप्रीम कोर्टा(Supreme Court)तूनही झटका बसलाय. 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. मात्र विधीमंडळाकडे निलंबनाच्या निर्णयाचा, फेरविचार करण्याची मुभा दिल्याचं आशिष शेलारां(Ashish Shelar)नी सांगितलंय.
ओबीसीं(OBC)चा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून छगन भुजबळां(Chhagan Bhujbal)नी विधानसभेत ठराव मांडला. त्याचवेळी विधानसभेत भाजपाच्या आमदारांनी जोरदार हंगामा केला. अध्यक्षस्थानी, तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव होते. गदारोळ सुरू असतानाच भाजपाचे आमदार संजय कुटेंनी अध्यक्षांचा माइक ओढला. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात आई-बहिणीवरून भाजपाच्या आमदारांनी शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप भास्कर जाधवांनी केला होता.
संजय कुटे, आशिष शेलार, योगेश सागर, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीयांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत, भाजपानं 4-2 असा महाविकास आघाडीवर विजय मिळवला..मात्र आमदारांच्या निलंबनावरुन सुप्रीम कोर्टात मात्र झटका बसला. आता 11 जानेवारीच्या पुढच्या सुनावणीकडे लक्ष असेल.