मुंबई: कोरोनामुळे अनेक मुलांनी आपल्या आई किंवा वडिलांना गमवाले आहे. काहींनी दोघांनाही गमावले आहे. अशा मुलांना आधार देण्याची गरज आहे. कोरोनामुळे अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये. त्यासाठी दोन्ही सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. (supriya sule appeals government to help COVID-19 orphans)
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोनाच्या विषाणूंमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक मुलांच्या डोक्यावरचे माता-पित्यांचे छत्र नष्ट झाले आहे. घरातील कमावत्या पालकाचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे अनेक मुलांच्या भविष्याचा प्रश्न देखील प्रकर्षाने पुढे आला आहे. त्यांचे शिक्षण,आरोग्य इ.ची काळजी घेणे आवश्यक आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
या मुलांना चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. केंद्र व राज्यांनी परस्पर सामंजस्याने व गांभीर्याने या संदर्भात काम करण्याची आवश्यकता आहे. मुलं देशाचे भविष्य असतात. त्यामुळे त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम आपल्याला करावेच लागणार आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी देखील आहे. त्यामुळेच कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये. यासाठी दोन्ही यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. कृपया,याबाबत सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती, असं आवाहनही त्यांनी केलं.
दरम्यान, कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांना किंवा त्यापैकी एकाला गमावलं आहे. त्यामुळे अनेक मुलं अनाथ झाले आहेत. अशा मुलांना उभं करण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजने अंतर्गत या मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. आई-वडील किंवा त्यापैकी एकाला गमावलेल्या मुलांना वयाच्या 18 व्या वर्षी मासिक सहायता राशी आणि वयाच्या 23 व्या वर्षी पीएम केअर्समधून 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
त्याशिवाय या मुलांना मोफत शिक्षण देण्यावरही भर दिला जाणार आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज दिलं जाईल. त्यासाठीचं व्याज पीएम केअर्स फंडातून दिलं जाईल. या अनाथ झालेल्या मुलांना वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत आयुषमान भारत योजने अंतर्गत पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमाही दिला जाणार आहे. त्यासाठीचं प्रीमियम पीएम केअरमधूनच भरलं जाणार आहे. (supriya sule appeals government to help COVID-19 orphans)
त्यामुळेच कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये यासाठी दोन्ही यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे.कृपया,याबाबत सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती. @smritiirani @AdvYashomatiINC #coronavirus
— Supriya Sule (@supriya_sule) June 2, 2021
संबंधित बातम्या:
कोरोना काळात अनाथ झालेल्यांसाठी 10 लाखांचा निधी, मोदींची मोठी घोषणा; काय आहे योजना?, वाचा!
Sharad Pawar | लस पुरवठ्याबाबत शरद पवार ‘सीरम’शी चर्चा करणार, नवाब मलिक यांची माहिती
तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात; संजय राऊतांची चंद्रकांतदादांवर खोचक टीका
(supriya sule appeals government to help COVID-19 orphans)