अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस विरोध करणारे शंकराचार्य उद्धव ठाकरे यांना भेटणार

| Updated on: Jul 15, 2024 | 11:31 AM

Swami Avimukteshwaranand Saraswati: नेहमी वादात राहणारे उत्तराखंड ज्योतिष पीठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद १५ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहे.

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस विरोध करणारे शंकराचार्य उद्धव ठाकरे यांना भेटणार
uddhav thackeray
Follow us on

नेहमी वादात राहणारे उत्तराखंड ज्योतिष पीठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद १५ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहे. अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठाला विरोध करुन शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद चर्चेत आले होते. राम मंदिर पूर्ण झाले नसताना प्राणप्रतिष्ठा करण्यास शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी विरोध केला होता. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिले होते. त्यामुळे शंकराचार्य आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा होते? त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहे स्वामी अविमुक्तेश्वरानंद

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्यास विरोध केला होता. मंदिराचे कळस पूर्ण झाले नसल्यामुळे शास्त्रांच्या दृष्टिने प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. सप्टेंबर 2022 मध्ये शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी समाधी घेण्यापूर्वी उत्तराधिकारीची निवड केली होती. त्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्योतिष पीठ बद्रीनाथचे प्रमुख केले होते. 15 ऑगस्ट 1969 मध्ये प्रतापगडमधील ब्राह्मणपूर गावात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे खरे नाव उमाशंकर पांडे होते. त्यांनी सहावीपर्यंत गावात शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेले.

वडिलांनी संत रामचैतन्य यांच्याकडे सोडले

उमाशंकर पांडे यांना त्यांच्या वडिलांनी एका वेळेस गुजरातमध्ये नेले. त्या ठिकाणी काशीचे संत रामचैतन्य यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी उमाशंकर यांना संत रामचैनत्य यांच्याकडेच सोडून दिले. गुजरातमध्ये काही वर्ष अध्यपन केल्यानंतर उमाशंकर वाराणसीत पोहचले. त्या ठिकाणी त्यांची भेट स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याशी झाली. त्यानंतर त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात शिक्षण घेतले. 2000 मध्ये स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यांना दीक्षा दिली आणि ते उमाशंकर पांडे ऐवजी स्वामी अविमुक्तेश्वरानंद बनले.

हे सुद्धा वाचा

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस का केला होता विरोध

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात सांगितले होते की, मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मंदिर पूर्णपणे बांधले पाहिजे. काही लोकांना शास्त्राचे ज्ञान नसल्याने हे फारसे समजू शकत नाही. गर्भगृह बांधले म्हणजे काम पूर्ण झाले असे नाही. बहुतेक लोकांना असे वाटते की मूर्तीला अभिषेक करणे आवश्यक आहे, परंतु तसे नाही. मंदिरात अभिषेक करायचा आहे.