मुंबई : महापालिकेतील सर्व सभा प्रत्यक्ष घ्या आणि लसीचे दोन डोस घेतलेल्या पत्रकारांना सभेत प्रवेश द्या, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर दालनाबाहेर जोरदार निदर्शने केली. (Take BMC meeting directly, admit journalists who have taken vaccine, BJP corporators protest outside Mayor’s Hall)
आंदोलनकर्ते भाजप नगरसेवक म्हणाले की, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे. राज्य शासनाने जास्त गर्दी होत असलेल्या मोहरमच्या मिरवणुकीस देखील परवानगी दिली होती. भारताचे सर्वोच्च सभागृह असलेली लोकसभा प्रत्यक्ष स्वरुपात होते. मात्र महापालिकेच्या वैधानिक समिती सभा व विशेष सभा अद्यापही प्रत्यक्ष न घेता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभेत कोण सदस्य काय बोलला हे नीट ऐकू येत नाही, तसेच प्रतिध्वनी ऐकू येतो. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील समस्या मांडता येत नाहीत. त्यामुळे सदर सर्व बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगऐवजी प्रत्यक्ष घेणे आवश्यक आहे, अशी मागणी भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
महापालिका सभा व सर्व वैधानिक समित्यांच्या सभा आभासी पद्धतीने होत असल्याने पत्रकारांनाही या सभांमध्ये सहभागी होता येत नाही. प्रशासनाला वारंवार विनंती करूनही पत्रकारांना सभांमध्ये आभासी पद्धतीने आजवर सहभागी करून घेतलेले नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार तुम्हाला महापालिका सभेत का नको आहेत? असा सवाल करत पालिकेतील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी व पारदर्शक कारभारासाठी महापालिकेच्या वैधानिक समिती व विशेष समिती सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्यात याव्यात तसेच सर्व सभांमध्ये पत्रकारांना प्रवेश द्यावा, अशी मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
कोविडचा धोका ओसरत असताना भ्रष्टाचाराचा अजेंडा रेटण्यासाठी @mybmc च्या वैधानिक समितीच्या बैठका आभासी पद्धतीने घेणाऱ्या आणि पत्रकारांना इथे प्रवेश नाकारणाऱ्या महापौर @KishoriPednekar यांच्या दालनासमोर आज भाजप नगरसेवकांनी तीव्र निदर्शने केली. १/२ pic.twitter.com/x54QSYVywe
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) September 22, 2021
इतर बातम्या
चंद्रकांत पाटलांचे आरोप दळभद्री, चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा करणार: संजय राऊत
संजय राऊत मित्र आहेत, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
कायदेशीर सल्ल्याला किती वेळ लागतो?, ओबीसी आरक्षण अध्यादेशावरून राऊतांचा राज्यपालांना सवाल
(Take BMC meeting directly, admit journalists who have taken vaccine, BJP corporators protest outside Mayor’s Hall)