टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज मुंबईत दाखल झाली आहे. टीम इंडियाने अनेक वर्षांनी देशासाठी वर्ल्ड कप जिंकून आणला आहे. त्यामुळे हा विजय खूप खास आहे. भारताला हा विजय मिळवून दिल्याबद्दल मुंबईतील चाहते टीम इंडियाचं प्रचंड कौतुक करत आहेत. टीम इंडियाचे लाखो चाहते आज मुंबईत रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात टीम इंडियाच्या स्वागतासाठी विजयी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. नरीमन पॉईंटच्या एनसीपीए पासून वानखेडे स्टेडियम अशी ही मिरवणूक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीसाठी लाखो चाहते मरीन ड्राईव्हर आले आहेत. यामध्ये तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तसेच वानखेडे स्टेडियममध्येही भरगच्च गर्दी जमलेली आहे. क्रिकेट चाहत्यांच्या सेलिब्रेशनचे स्पेशल 5 व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
यातील पहिला व्हिडीओ हा चर्चगेट रेल्वे स्थानकाचा आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकावर तरुणांच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आला आहे. हजारो तरुण इथून मरीन ड्राईव्हच्या दिशेला निघाले आहेत. या तरुणांकडून टीम इंडियाच्या जयघोषाच्या घोषणाबाजी करण्यात येत आहेत.
चर्चगेट रेल्वे स्थानकावर तरुणांच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आला आहे. हजारो तरुण इथून मरीन ड्राईव्हच्या दिशेला निघाले आहेत. या तरुणांकडून टीम इंडियाच्या जयघोषाच्या घोषणाबाजी करण्यात येत आहेत. #TeamIndia #Mumbai #mumbai #wankhedestadium #churchagate #RohitSharma #MarineDrive… pic.twitter.com/4JSqZJdJNa
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2024
दुसरा व्हिडीओ हा मरीन ड्राईव्ह परिसरातील आहे. या परिसरात तरुणांचा किती मोठी गर्दी केली आहे ते बघायला मिळत आहे.
मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांची अफाट गर्दी #TeamIndia #Mumbai #mumbai #wankhedestadium #churchagate #RohitSharma #MarineDrive #mumbainews pic.twitter.com/SAHlAMLYX3
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2024
तिसरा व्हिडीओदेखील मरीन ड्राईव्ह परिसरातीलच आहे. या परिसरातील एका उंच इमारतीवरुन कॅमेऱ्यात क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीचा व्हिडीओ कैद करण्यात आला आहे.
क्रिकेट चाहत्यांची तुफान गर्दी, असं दृश्य फार कमी वेळा बघायला मिळेल. #TeamIndia #Mumbai #mumbai #wankhedestadium #churchagate #RohitSharma #MarineDrive #mumbainews pic.twitter.com/LkRidTxNxD
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2024
वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट चाहत्यांची तुफान गर्दी जमा झाली आहे. क्रिकेट चाहत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.#TeamIndia #Mumbai #mumbai #wankhedestadium #churchagate #RohitSharma #MarineDrive #mumbainews pic.twitter.com/63UbEbuwMj
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2024
पाचवा व्हिडीओ हा मरीन ड्राईव्ह येथील गर्दीचाच आहे.
मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दीच गर्दी #TeamIndia #Mumbai #mumbai #wankhedestadium #churchagate #RohitSharma #MarineDrive #mumbainews pic.twitter.com/jWjJ6UanWW
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2024