मुंबई पोलिसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अखेर अटक केली आहे. विशेष म्हणजे घटनेनंतर तिसऱ्या दिवशी पोलिसांनी मु्ख्य आरोपी मिहीर शाह याला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह आणि गाडीचा ड्रायव्हर राजेंद्रसिंग बिडावत या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. या दरम्यान राजेश शाह यांना जामीन मिळाला. पण बिडावत हा अद्यापही अटकेत आहे. दुसरीकडे मिहीर शाह याच्या आई आणि बहिणी घराला कुलूप लावून गायब झाल्या होत्या. आता पोलिसांनी त्यांनादेखील अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस आगामी काळात आणखी सखोल तपास करणार आहेत. आरोपी मिहीर याने अपघाताआधी मध्यरात्री जुहू येथे एका बारमध्ये पार्टी केल्याची माहिती समोर आली होत. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं याची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
या प्रकरणातील 10 महत्त्वाचे अपडेट्स:
- वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला तिसऱ्या दिवशी अटक करण्यात आली आहे.
- मुख्य आरोपी मिहीर शाह याला मुंबईतूनच पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
- मिहीर शाह याची आई आणि दोन बहिणींना शहापूरमधून अटक करण्यात आली आहे.
- मिहीरला अटक करतानाच, त्याला मदत करणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये त्याची आणि दोन्ही बहिणींचादेखील समावेश आहे.
- आरोपी मिहीर शाह अपघातानंतर मोबाईल स्विच ऑफ करुन फरार होता.
- मिहीर शाह मुंबईतल्या काही भागात लपून लपून वास्तव्य करत होता.
- याच मिहीर शाहला लपण्यसाठी मदत करणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
- या प्रकरणात आता किती जाणाना आरोपी करायचं? याबाबत तपास करुन निर्णय घेणार आहेत.
- अपघात प्रकरणात मिहिरचे वडील राजेश शाह यांना कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. तर त्याच्या गाडीचा ड्रायव्हर अद्यापही अटकेतच आहे.
- वरळी हिट अँड रन प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.