Aaditya Thackeray | दिवाळी संपल्यावर बोनस देणार? आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

| Updated on: Nov 08, 2023 | 2:10 PM

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे यांनी टि्वट केलय. त्यांनी महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या प्रश्नावरुन शिंदे सरकारला धारेवर धरलय. पुढील 24 तासांत यापैकी काय होते ते पाहू असे सूचक शब्द त्यांनी टि्वटमध्ये वापरले आहेत.

Aaditya Thackeray | दिवाळी संपल्यावर बोनस देणार? आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल
aaditya thackeray and eknath shinde
Follow us on

मुंबई : दिवाळी तोंडावर आलीय. पण अजूनही BMC आणि BEST च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळालेला नाही, त्यावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. “अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच BMC आणि BEST च्या कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही CMO च्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके सरकार (लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत) दिवाळी बोनस देणार आहे की नाही?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. ‘देणार असेल, तर कधी? दिवाळी संपल्यावर?’ असा खोचक टोमणा लगावला आहे. आदित्य ठाकरे शिंदे सरकारला सतत लक्ष्य करत असतात.

“रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराला बडतर्फ करण्याची फाइल अंतिम स्वाक्षरीसाठी महापालिका आयुक्तांच्या डेस्कवर पोहोचली आहे. ते त्यावर स्वाक्षरी करून त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करणार की खोके सरकारच्या दबावापुढे झुकून त्यांच्याबरोबरीने मुंबई लुटणार? पुढील 24 तासांत यापैकी काय होते ते पाहू…” असं आदित्य ठाकरे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. आदित्य ठाकरे मुंबईच्या प्रश्नावरुन सतत आवाज उठवत असतात. मुंबईतील रस्त्यांचा विषय त्यांनी लावून धरलाय.


ग्राम पंचायत निकालात ठाकरे गट सर्वात शेवटी

दरम्यान राज्यात नुकताच ग्राम पंचायच निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात महायुतीने महाविकास आघाडीवर मात केली. महायुतीमध्ये भाजपा अव्वल पक्ष ठरला. त्यानंतर अजित पवार गट आणि शिंदे गटाने ग्राम पंचायती जिंकल्या. जळगाव ग्रामीण आणि महाडमध्ये शिंदे गटाने लक्षणीय यश मिळवलं. शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा दुप्पट ग्राम पंचायची जिंकल्या. राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत ठाकरे गट शेवटच्या स्थानावर राहिला.