महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद राखा; ‘सामनातू’न डरकाळी

| Updated on: Dec 17, 2022 | 8:00 AM

शिवरायांचा महाराष्ट्र मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही हे दाखविणारा आजचा महामोर्चा आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावांतून लोक मुंबईतील मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान किती प्रखर आहे हे दाखवून देतील.

महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद राखा; सामनातून डरकाळी
महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद राखा; 'सामनातू'न डरकाळी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: महाविकास आघाडीचा आज महामोर्चा निघणार आहे. महापुरुषांचा अवमान होत असतानाही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मौन बाळगून असल्याने या सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून राज्यातील आघाडी सरकारवर घणाघाती हल्ला चढवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनता या मोर्चात वाघाच्या छातीने आणि सिंहाच्या हिंमतीने सामील होईल, असं सांगतानाच महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद राखा, असा इशाराच दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून देण्यात आला आहे.

अग्रलेखातून हल्लाबोल काय?

महाराष्ट्राच्या जनतेलाही दिल्लीचे गुलाम बनविण्याचा त्यांचा इरादा आहे. महाराष्ट्र विकून दिल्लीच्या चरणी त्यांना खोकेच अर्पण करायचे आहेत. त्यासाठी छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा दैवतांचे अपमान सहन केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर बसवले गेले आहे. हे सरकार म्हणजे महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे आहेत. हे धिंडवडे रोखण्यासाठीच तमाम महाराष्ट्रप्रेमींचा एक अति विराट मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे.

आजचा मोर्चा म्हणजे 11 कोटी मऱ्हाठी जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावांतून लोक मुंबईतील मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान किती प्रखर आहे हे दाखवून देतील.

राज्यपाल पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या राजभवनात बसून छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करते व मिंधे सरकार त्या अपमानाचे समर्थन करते.

छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा महान दैवतांचा अपमान होत असताना मऱ्हाठी जनता गप्प बसेल काय? छे, छे! ही जनता शिवराय, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्या जयजयकाराच्या बुलंद घोषणा देत महामोर्चात सामील होईल. शिवरायांचा महाराष्ट्र मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही हे दाखविणारा आजचा महामोर्चा आहे.

बेळगावातील मऱ्हाठी जनतेवर अन्यायाचा नवा वरवंटा फिरवला. वातावरण तप्त झाले तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावून फक्त 15 मिनिटे चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमा भागातील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवायची असे ठरले. त्याने काय घडणार?

काही झाले तरी कर्नाटकचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार. कारण महाराष्ट्रात एक वाकड्या शेपटीचे बेकायदा सरकार सत्तेवर बसले आहे व ते दिल्लीचे गुलाम आहे.