“कोण नितेश राणे? त्यांची आणि संजय राऊतांची तुलना कशी होणार”; ठाकरे गटाच्या नेत्याने राणे उडवून लावलं…

| Updated on: Jun 15, 2023 | 6:43 PM

ज्यांनी 10 राजकीय पक्ष फिरुन आलेले आहेत, त्यांनी आम्हाला पक्षाची एकनिष्ठा शिकवू नये. कारण यांच्यासारखे आम्ही पक्ष फिरुन आलो नाही, कारण आम्ही एकनिष्ठ राहिलो आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

कोण नितेश राणे? त्यांची आणि संजय राऊतांची तुलना कशी होणार; ठाकरे गटाच्या नेत्याने राणे उडवून लावलं...
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राणे पिता-पुत्र आणि खासदार संजय राऊत यांचा वाद मिठण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. सध्या खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्यावरुन आता संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर पलटवार केला आहे. नितेश राणे यांनी शरद पवार यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांनी पवारांसह संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत म्हणजे भांडुपचे देवानंद असल्याची खोचक टीका त्यांनी केली होती. त्यावरून आता राणे आणि राऊत असा वाद रंगला आहे.

आमदार सुनील राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांनी निष्ठा म्हणजे काय असावी हे राणे यांनी आम्हाला शिकवू नये असा जोरदार टोला त्यांनी त्यांना हाणला आहे.

यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका करत अपात्रतेच्या मुद्यावरून त्यांनी सरकारला घेरले आहे. हे सरकार असंविधानिक असून विश्वासघात करुन सत्ता स्थापन केल्याचा  आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास

अपात्र आमदारांविषयी बोलताना ते म्हणाले की, आमचा या न्यायव्यवस्थेवर विश्वास असून न्यायालयाच्या त्या निकाल देणार त्या दिवसाची आम्ही वाट बघत आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितले. तो निकाला ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक असून ठाकरे गटाचे आमदार आम्ही सगळे हजर राहणार असल्याचेही त्यांनी शिवसेना आणि भाजपला सांगितले आहे.

राणेंनी एकनिष्ठा शिकवू नये

नितेश राणे यांच्याकडून संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आल्यानंतर सुनील राऊत यांनी त्यांना जोरदार टोला हाणला आहे.यावेळी त्यांनी कोण नितेश राणे असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. ज्यांनी 10 राजकीय पक्ष फिरुन आलेले आहेत, त्यांनी आम्हाला पक्षाची एकनिष्ठा शिकवू नये. कारण यांच्यासारखे आम्ही पक्ष फिरुन आलो नाही, कारण आम्ही एकनिष्ठ राहिलो आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.