मुंबई– नेपाळमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या तारा एयरक्राफ्टचे (Nepal plane Crash)अवशेष आता सापडले आहेत. हे प्लेन नेपाळच्या मुस्सांगमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत, (14 Dead)इतरांचा शोध सुरु आहे. या विमानात महाराष्ट्रातील चार जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळच्या भारतीय दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार, या प्लेनमध्ये चालकासह २२ जण प्रवास करत होते. यात ठाण्यातील अशोक त्रिपाठी, त्यांची पत्नी वैभवी बांदेकर, मुलगा धनुष त्रिपाठी आणि मुलगी ऋतिका त्रिपाठी हे प्रवास करत होते. (Thane family)हे सर्वजण नेपाळमधील पोखरा येथील एका मंदिरात दर्शनासाठी जात होते.एयरक्राफ्ट पोखरावरुन जोमसोमसाठी सकाळी ९.५५ वा निघाले होते. १०.२० ला लँड करणार होते, पण त्यापूर्वीच एयर ट्राफिक कंट्रोलशी त्याचा संपर्क तुटला. या २५ मिनिटांत या कुटुंबाचं आयुष्यचं उध्वस्त झालंय. एक संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं. त्याबाबत हळहळ व्य़क्त करण्यात येते आहे.
अशोक त्रिपाठी हे त्यांची पत्नी वैभवी हिच्यासोबत राहत नव्हते. दोघांचाही घटस्फोट होणार होता आणि हे प्रकरण कोर्टात होते. कोर्टाने निर्णय होईपर्यंत प्रत्येक वर्षात दहा दिवस कुटुंबाने एकत्र घालवावेत असा आदेश दिला होता. यानंतरच हे चारही जण नेपाळला गेले होते. दोन्ही मुले आई वैभवीसोबत राहत होते, तर अशोक हे एकटे राहत असल्याची माहिती आहे.
विमान दुर्घटनेची माहिती ठाण्यात मिळाल्यानंतर, या घटनेबाबत दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. वैभवी ज्या ठिकाणी राहत होत्या, तिथल्या शेजारच्यांनी सांगितले की ही घटना अत्यंत वाईट आहे, आणि आम्हाला सगळ्यांनाच याचा धक्का बसलेला आहे. सध्या घरात केवळ वैभवी यांची म्हातारी आई आहे. त्यांना कळाल्यापासून त्या अतिव दु:खात आहेत. वैभवी यांच्या आईचे काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन झाले होते. त्या घरात एकट्याच होत्या.
वैभवी या सॉफ्टवेअर इंजिनिअर होत्या. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये त्या एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा मुला धनुष हा इंजिनिअर पदवीधर होता आणि मुलगी रितिका ही शाळेत शिकत होती.
अशोक त्रिपाठी यांची ओडीशामध्ये एचआर कन्सल्टन्सीची फर्म आहे. त्यांना पाच भाऊ-बहीण आहेत, त्यातील ते चौथे होते. त्यांच्या घरातील इतर कुटुंब पुण्यात राहतात. कुटुंबाला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ते रत्री उशिरा ठाण्याच्या घरी पोहचलेत. अशोक यांचे वडील जिल्हा न्यायाधीश होते, ११ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले होते. तर अशोक यांच्या आईचे निधन २०२० साली झाले होते.
हा परिवार ठाण्याच्या कापूरबावडी परिसरात माजीवाजा हायराईज सोसायटीत राहत होता. ठाणे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना नेपाळच्या भारतीय दुतावासाशी संपर्क करण्यास सांगितले होते. नेपाळच्या भारतीय दुतावासानेही दुर्घटनेबाबात आपला हेल्पनाईन क्रमांक जाहीर केला आहे.
या दुर्घटनेनंतर नेपाळमधील भारतीय दुतावासाला विमानातील प्रवाशांमध्ये मगाराष्ट्रातील चार जण असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुंबई पोलिसांना संपर्क करण्यात आला. वैभवी बांदेकर यांच्या पासपोर्टवर बोरिवलीतील चिकूवाडीचा पत्ता होता. जेव्हा मुंबई पोलीस चिकूवाडीच्या पत्त्यावर पोहचले तेव्हा घराला कुलुप सापडले. हा फ्लॅट त्यांनी कुणालातरी भाड्याने दिला असल्याची माहिती मिळाली. भाडेकरु सध्या देशाबाहेर असल्याचीही माहिती मिळाली. शेजारच्यांनी त्रिपाठी कुटुंब सध्या ठाण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ठाण्याच्या पत्त्यावर संपर्क केला.
अशोक यांचे चुलत भाऊ कानन त्रिपाठी यांनी सांगितले की, अशोक त्यांच्यासोबत नेपाळ यात्रेचा प्लॅन करत होता. या नेपाळ यात्रेसाठी अशोक उत्सुक आणि आनंदी होता. ऐनवेळी काम आल्याने आपण जाऊ शकलो नसल्याचेही कांचन यांनी सांगितले आहे. अशोक २६ मे रोजी मुंबईत आले होते आणि कुटुंबासह नेपाळला निघाले होते. अशोक परत कधी येणार याची माहिती त्यांनी दिली नव्हती, असे त्यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराने दिली आहे.
नेपाळच्या सैन्याच्या शोधपथकाने दुर्घटनाग्रस्त जागेची माहिती मिळाल्यानंतर विमानांच्या अवशेषाचा फोटो शेअर केला आहे. विमानाचे अवशेष मुस्तांग परिसरात सापडले आहेत. एयरक्राफ्ट पोखरावरुन जोमसोमसाठी सकाळी ९.५५ वा निघाले होते. १०.२० ला लँड करणार होते, पण त्यापूर्वीच एयर ट्राफिक कंट्रोलशी त्याचा संपर्क तुटला. यात ३ क्रू मेंबर्ससहित २२ जण प्रवास करत होते. यात ४ भारतीय होते. हे विमान ४३ वर्षे जुने होते.