मुंबई :देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “1874 ते 2021 हा बेस्टचा मोठा प्रवास आहे. पहिली बेस्ट ही घोडगाडीत होती. अजून ट्रामच्या आठवणी आहेत. मला माँ आणि बाळासाहेब ट्राममधून फिरायला घेऊन जात असत. पुढे यात बदल होत गेले. आता ही इलेक्ट्रिकल बस आली आहे. मी शाळेत सुद्धा बेस्ट बसने गेलो होतो. बेस्ट ही सेवा देत आहे”.
मुंबईकराचा बेस्ट आणि लोकल रेल्वेशी संबंध येतो. बेस्ट ऊन वारा पावसात सुरू असते. कोरोनाकाळात बेस्टने उत्तम काम केलं. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद. आदित्यने सांगितलं की आपल्या वचननाम्यात आम्ही म्हटलं होतं एकच तिकीट सगळ्यांसाठी पाहिजे. बेस्टची एक तिकीट सिस्टिम सुरु करण्याचा प्रयत्न आहे. बेस्ट, रेल्वे आणि मेट्रोमध्ये एकच तिकीट चालू शकेल. लोकलबाबत विचारणा होत आहे , चावी आपल्याकडे आहे, ती किती फिरवायची हे आपल्या हातात आहे, लोकल सुरू करायचा आहेत, हॉटेल सुरू करायच्या आहेत. यांची चावी आपल्या हातात आहे अंदाज घेऊन फिरवू कशी फिरावायची असं मुख्यमंत्री म्हणाले.
हॉटेलवाले काल भेटले , तेव्हा त्यांना म्हटलं की थोडं धीराने सर्व हळूहळू खुले करू. लोकल आणि रेस्टॉरंटबाबत लवकर निर्णय घेऊ. कोरोना उलटणार नाही ना यामुळे खबरदारी घेतोय. लोकल रेस्टोरंट सुरू करण्याबाबत दोन पाच दिवसांमध्ये कधी काय सुरू करायचा याबाबत निर्णय सरकारकडून कळवळा जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
बेस्ट उपक्रमचे महाव्यस्थापक लोकेश चंद्र म्हणाले, “45 टक्के इलेक्ट्रिक बस सेवा बेस्टच्या माध्यमातून 2025 पर्यंत करण्याचं टार्गेट असेल.
15 मिनिटात बस सेवा उपलब्ध व्हावी अशाप्रकारे नियोजन बेस्टकडून केले जाईल. बस प्रवास मोबाईल अॅपद्वारे करता येईल, बस ट्रॅकिंगसुद्धा अॅपमध्ये असेल. बेस्ट तिकीट , बेस्ट पास सुद्धा या अॅपमधून काढता येईल. बस कधी कुठे असणार यांची पूर्ण माहिती या अॅपमध्ये असेल. डिजीटल बस प्रवासाचा अनुभव मुंबईकरांना लवकरच घेता येईल”
VIDEO : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण
संबंधित बातम्या
CM Inaugurates E-Bus | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण