ही प्रेम कहाणी ऐकून संपूर्ण देशाला बसला होता धक्का, ज्यानंतर कायदाच बदलला

| Updated on: Apr 12, 2024 | 6:09 PM

नानावटी हे प्रकरण भारतातील सर्वात सनसनाटी गुन्ह्यांपैकी एक होता. पण यामुळे ज्युरी पद्धतीचा अंत झाला. हा गुन्हा घडला तेव्हा आरोपीला आधी सोडून देण्यात आले. नंतर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा शिक्षा सुनावली. पण राज्यपालांनी पुन्हा नंतर शिक्षा माफ केली. काय घडलं होतं नेमकं या प्रकरणात जाणून घ्या.

ही प्रेम कहाणी ऐकून संपूर्ण देशाला बसला होता धक्का, ज्यानंतर कायदाच बदलला
Follow us on

Love story : आज आपण 5 ते 10 रुपयांना वर्तमानपत्र खरेदी करतो. पण जर तुम्हाला विचारलंं की, 64 वर्षांपूर्वी तुम्ही वृत्तपत्र 2 रुपयांना विकत घेतले असते का तर याचे उत्तर कदाचित नाही असे अनेकांनी दिले असते. पण असे एक वृत्तपत्र होते लोक ब्लिट्झ साप्ताहिक जे 2 रुपयांना विकले गेले. तेव्हा त्याची खरी किंमत फक्त २५ पैसे होती. कारण 1959 मध्ये एका नौदल अधिकाऱ्याने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली होती. यानंतर त्याने पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पण असे असतानाही न्यायालयाने त्यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली. नंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला जेव्हा शिक्षा सुनावली तेव्हा खून झालेल्या व्यक्तीच्या बहिणीने त्याला माफी देण्याची शिफारस केली. यानंतर सरकारनेही त्यांना माफ केले.

2016 मध्ये आलेला अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ हा चित्रपटही याच कथेवर आधारित आहे. या प्रकरणात सुनावणी ऐकण्यासाठी कोर्टात मोठी रांग लागायची. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी लोकं रांगेत उभे राहून वर्तमानपत्रे विकत घ्यायचे. ही घटना एका प्रेम कहाणीची आहे. जीचा अंत खुनाने झाला.

भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर केएम नानावटी यांचे पत्नी सिल्वियावर खूप प्रेम होते. त्यांना तीन मुले होती. त्यांचं जनजीवन सामान्य होतं. अनेक महिने समुद्रात तैनात राहिल्यानंतर 1959 मध्ये ते जेव्हा घरी आले तेव्हा ही घटना घडली. पत्नी सिल्व्हियाचे वागणे त्यांना विचित्र वाटले. तरीही त्यांनी आपल्या मनाला समजवायचा प्रयत्न केला. कदाचित इतके दिवस दूर राहिल्यामुळे ती रागावली असेल असे त्यांना वाटत असेल. पण एकेदिवशी त्यांनी सिल्व्हियाला प्रश्न केला. यावेळी सिल्व्हियाने जे सांगितले ते ऐकून त्यांना धक्का बसला. ती म्हणाली की, मी एका दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. यानंतर नौदल मुख्यालयात जाऊन त्यांनी रिव्हॉल्व्हर घेतली आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

एका पार्टीत सिल्वियाची भेट मुंबईतील बिझनेसमन प्रेम आहुजा यांच्याशी झाली होती. दोघांमध्ये त्यानंतर प्रेमसंबंध सुरु झाले. नानावटी घरी नसताना ते एकमेकांना भेटू लागले. यानंतर नानावटी यांनी प्रेम आहुजा यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर गोळीबार केला. प्रेम आहुजा यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी प्रेमची बहीण मॅमीही तिथे उपस्थित होती. यानंतर नानावटी यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली.

पण गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर ही ज्युरींनी त्याची निर्दोश मुक्तता केली. या प्रकरणाची सुनावणी 9 सदस्यांच्या ज्युरींनी केली. नानावटी यांनी न्यायालयात सांगितले की, ते प्रेम आहुजाच्या घरी पत्नी सिल्वियाशी लग्न करण्यास सांगण्यासाठी आले होते. प्रेमने हे मान्य केले नाही आणि नंतर पिस्तूल उचलण्यावरून हाणामारी झाली आणि अचानक गोळी झाडण्यात आली. यामुळे प्रेम आहुजाचा मृत्यू झाला. पत्नी सिल्व्हियानेही पतीच्या या युक्तिवादाचे समर्थन केले. यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आणि नानावटी यांना तुरुंगात टाकण्यात आले.

नानावटी यांना उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. मात्र, तब्येत बिघडल्याने त्यांना तीन वर्षांनी पॅरोल देण्यात आला. यानंतर पंडित नेहरूंची बहीण आणि मुंबईच्या तत्कालीन राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित यांनी त्यांची शिक्षा माफ केली. प्रेम आहुजाची बहीण मामी हिनेही नानावटी यांना माफी देण्याची शिफारस केली होती. यानंतर नानावटी पत्नी आणि मुलांसह कॅनडाला शिफ्ट झाले. 2003 मध्ये त्यांचे निधन झाले. या प्रकरणानंतर सरकारने ज्युरी ट्रायल थांबवली. ज्युरीने एखाद्या खटल्याची सुनावणी केली तेव्हा ही शेवटची केस होती.