मुंबई : महाराष्ट्राला आणखी दोन वंदेभारतची ( Vande Bharat ) अनोखी भेट मिळाली आहे. मुंबई ते सोलापूर ( SOLAPUR ) आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदेभारतचे उद्घाटन येत्या दहा ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( NarendraModi ) यांच्या हस्ते होत आहे. या दोन गाड्यांमुळे मध्य रेल्वेला मिळालेल्या वंदेभारतची संख्या आता तीन झाली आहे. तर महाराष्ट्राला मिळालेल्या वंदेभारतची गाड्यांची संख्या चार झाली आहे. काय आहे या दर ताशी 180 किमीच्या वेगाने धावणाऱ्या वंदेभारत गाड्याची योजना आणि रचना पाहूया
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम रेल्वे बोर्डाकडून आला असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ठ केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSTM) येथून सीएसएमटी-सोलापूर आणि सीएसएमटी-साई नगर शिर्डी या दोनवंदेभारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
या दोन वंदे भारत एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील शिर्डी आणि पंढरपूर या लोकप्रिय तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे. यामुळे चार आंतरराज्यीय वंदेभारत गाड्या असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुंबईतून पहीली वंदेभारत मुंबई सेंट्रल ते गांधीनगरपर्यंत धावली होती. ही गाडी पश्चिम रेल्वेला मिळाली होती. त्यानंतर 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चे उद्गाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. आता मुंबई ते सोलापूर आणि शिर्डी वंदेभारतला ते हिरवा झेंडा दाखवतील. देशात एकूण आठ वंदे भारत सध्या धावत आहेत.
बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात सहभागी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी-मरोळ येथील बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अल जामिया येथील तस सैफिया विद्यापीठाचे उद्घाटन होणार आहे. मोदी यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बोहरा कॉलनी परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
6 फेब्रुवारीला बंगळुरू येथे ऊर्जासप्ताहाचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी ६ फेब्रुवारी रोजी भारत ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन करतील आणि कर्नाटकातील बंगळुरू आणि तुमाकुरू येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. कर्नाटक माहिती विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान ६ फेब्रुवारी रोजी सकाळी मडावरा जवळील बंगळुरू आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात भारत ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन करतील.