विजय, केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : येत्या 26 नोव्हेंबरला मुंबईत विधानभवनावर मराठा क्रांती मोर्चातर्फे गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चाचं नेतृत्त्व श्रीमंत शाहू छत्रपती करणार आहेत. त्यामुळे या मोर्चाची उत्सुकता वाढली असून, मोर्चांचा प्रभाव सुद्धा आधीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विधानभवनावर गोडी मोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापुरात घेण्यात आला.
कोण कोण करणार आंदोलनाचं नेतृत्त्व?
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत वेळ मागितला आहे. मागासवर्ग आयोगाची मुख्यमंत्री वाट पाहत होते. तो अहवालही सकारात्मक आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणाची शिफारस अहवालात असल्याचं बोललं जातं आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. तर मराठा आणि कुणबी यांना वेगळं गणलं जाण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणावरुन आता सवालही अनेक निर्माण झालेत :
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी दिवसागणिक आक्रमक होताना दिसतो आहे. आझाद मैदानातही मराठा समाजातील बांधवांनी उपोषण सुरु केले आहे. विविध ठिकाणी रोज निदर्शनं होत आहे. त्यामुळे आरक्षणासाठी राज्य सरकारवरही दबाव वाढत आहे. त्यात आता श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याच नेतृत्त्वात गाडी मोर्चा मुंबईत विधानभवनावर धडकणार असल्याने सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.