मुंबई – रविवारी रेल्वेच्या तांत्रिक दुरूस्तीसाठी मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येतो. मागच्या रविवारी पश्चिम रेल्वे (Western Railway) वाणगाव (Wangaon) येथे आठ तासांचा मेगा ब्लॉक घेतला. आता तिथे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकलसाठी स्वतंत्र पूल बांधण्यात आल्याने तिथे वेगाने लोकल चालवणे शक्य झाले आहे. यापुर्वी तिथं लोकलचं स्पीड अत्यंत कमी होतं म्हणजे 30 चं स्पीड होतं. आता तिथं 80 चं स्पीड शक्य आहे. त्याबाबत रेल्वे प्रशासनाने सगळी खबरदारी घेतली आहे. स्पीड वाढणार असल्याने त्या लाईनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगला दिलासा मिळाला आहे.
दोन मार्गिका स्वतंत्र झाल्याने स्पीड वाढणार
पश्चिम रेल्वेने मागच्या रविवारी एक स्पेशल मेगाब्लॉक घेतला होता. डहाणू क्षेत्रातील लोकांना अडथळा ठरणाऱ्या जाणाऱ्या आणि येण्यासाठी दोन स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. पूर्वी दोन लोक एकदम जवळून जात असल्याने अगदी काळजी घ्यावी लागत होती. त्यामुळे स्पीड अत्यंत कमी होतं. आता दोन मार्गिका स्वतंत्र झाल्याने स्पीड वाढणार आहे.
लोकलचा आकार रूंद असल्याने अडचण
त्या मार्गिकेवरती चालणाऱ्या लोकलचा आकार अधिक रूंद असल्याने आत्तापर्यंत अनेक अडचणी येत होत्या. आता दोन्ही मार्गिका खु्ल्या झाल्याने लावण्यात आलेले सगळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे त्या मार्गिकेवरून आता लोकल 80 च्या स्पीडने धावेल.
लोकल सेवांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला
भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती मागणी पाहता, मुंबई उपनगरीय विभागात एसी लोकल सेवांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेकडून 12 नवीन एसी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडे एसी सेवांची एकूण संख्या 20 वरून 32 झाली आहे. 5 मे पासून एसी लोकल प्रवासाच्या तिकिटांच्या भाड्यात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. 10 किमी पर्यंतच्या किमान सिंगल प्रवासाच्या तिकीटाची किंमत फक्त 35 रूपये आहे.
12 एसी लोकल सेवा सुरू केल्या
“प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेकडून 16 मे पासून आणखी 12 एसी लोकल सेवा सुरू केल्या आहेत. सुरू करण्यात आलेल्या अतिरिक्त १२ सेवांपैकी, प्रत्येकी ६ सेवा अप आणि डाऊन दिशेने सुरू आहेत.
विरार आणि चर्चगेट दरम्यान 5 आणि भाईंदर आणि चर्चगेट दरम्यान एक अशी लोकल सेवा सुरू आहे.