मुंबई : 12 ऑक्टोबर 2020 मध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बहुतांश भागात अचानक वीज गेली. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या लोकलवरही झाला. त्यावेळी मुंबईची बत्ती गुल करण्यामागे चीनचा हात होता, असा दावा अमेरिकेतील एका कंपनीने केला आहे. अमेरिकेतील वृत्तसंस्था न्यूयॉर्क टाईम्सने एका अभ्यासाचा हवाला देत हा दावा केला आहे.(The US-based company claims that China was behind the power outage in Mumbai)
भारत-चीन यांच्याच लडाखमध्ये सुरु असलेल्या तणावावेळी चीन भारतात ब्लॅक आऊट करण्याच्या तयारी होता, असा दावा केला जात आहे. चीनच्या हॅकर्सनी ऑक्टोबर महिन्यात भारतावर पॉवर ग्रीड, आयटी कंपन्या आणि बँकिंग सेक्टरवर तब्बल 40 हजार 500 वेळा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या बातमीमध्ये जूनमध्ये गलवान खोत्यात दोन्ही देशांच्या सैन्यात झालेल्या वादावादीनंतर 4 महिन्यांनी म्हणजे ऑक्टोबरमध्ये मुंबईत झालेल्या ब्लॅक आऊटमागे चीनचा हात होता असं म्हटलंय.
चीनचे एक व्यापर रणनीती आखत हा सायबर हल्ला घडवून आणला होता. सीमेवर चीनविरोधात कारवाई केली तर ते भारतातील वेगवेगळ्या पॉवर ग्रीडवर हल्ला करुन ते बंद करु शकतात, हे चीनला दाखवून द्यायचे होते, असं न्यूयॉर्क टाईम्सने केलेल्या अभ्यासात म्हटलंय. चीनी मालवेयर हा भारतातील वीज पुरवठा नियंत्रित करणाऱ्या प्रमाणील घुसला होता. त्यात हाय वोल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन्स आणि थर्मल प्लँटचाही समावेश होता, असंही या अभ्यासात सांगण्यात आलं आहे.
रेकॉर्डेड फ्यूचर या अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी कंपनीच्या अहवालानुसार भारताच्या वीज पुरवठा लाईनमध्ये चीनी व्हायरसने घुसखोरी केली होती. अमेरिकेतील ही कंपनी सरकारी एजन्सीसोबत इंटरनेटशी संबंधित विषयांचा अभ्यास करते. दरम्यान ही कंपनी पॉवर सिस्टिममध्ये पोहोचू शकत नव्हती, त्यामुळे त्याता पुढील तपास करता आला नसल्याचं या कंपनीने म्हटलंय.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तसेच इंटरनेटही बंद झाल्याने मुंबई-ठाण्यातील कामं ठप्प झाली होती. मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला होता. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असल्यानं जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात आली होती.
दादर
लालबाग
परळ
प्रभादेवी
वडाळा
ठाणे
नवी मुंबई
पनवेल
बोरिवली
मालाड
कांदिवली
पेण
पनवेल
उरण
कर्जत
खालापूर
मुंबईची बत्ती गुल झाल्यामुळे सर्व काही जागच्या जागी थांबलं होतं. वीजेअभावी रेल्वेच्या तिन्ही लाईन ठप्प झाल्या होत्या. तीनही मार्गावरील लोकल आहे त्या ठिकाणी थांबल्या होत्या. नेमकं लोकल का थांबल्या हे प्रवाशांनाही काहीवेळ समजत नव्हतं.
संबंधित बातम्या :
Mumbai Power Cut: मुंबईची बत्ती गुल; कार्यालये आणि रेल्वे वाहतूक ठप्प
Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल
The US-based company claims that China was behind the power outage in Mumbai