“ते राम मंदिराची तारीख सांगत नाहीत आणि हे सरकारमधून बाहेर पडण्याची”

| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

मुंबई : ते राम मंदिर बांधण्याची तारीख सांगत नाहीत आणि हे सरकारमधून बाहेर पडण्याची तारीख सांगत नाहीत, असे म्हणत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजप आणि शिवसेनेवर निशणा साधला. संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन दोन्ही पक्षांवर टीका केली. राम मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येयात्रेवर गेले आहेत. त्यावरुन सध्या महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात राम […]

ते राम मंदिराची तारीख सांगत नाहीत आणि हे सरकारमधून बाहेर पडण्याची
Follow us on

मुंबई : ते राम मंदिर बांधण्याची तारीख सांगत नाहीत आणि हे सरकारमधून बाहेर पडण्याची तारीख सांगत नाहीत, असे म्हणत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजप आणि शिवसेनेवर निशणा साधला. संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन दोन्ही पक्षांवर टीका केली. राम मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येयात्रेवर गेले आहेत. त्यावरुन सध्या महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपवर टीका केली.

संजय निरुपम नेमकं काय म्हणाले, त्यांचा ट्वीट :

उद्धव ठाकरे अयोध्येत!

उद्धव ठाकरे हे कालपासून अयोध्यायात्रेवर आहेत. राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांची फौज घेऊन अयोध्येत दाखल झाले आहेत. काल उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रसिद्ध शरयू नदीवर महाआरती झाली. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं.

राज्यात दुष्काळ असताना, विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना, राज्याच्या कानाकोपऱ्यातून अन्याग्रस्त जनता राजधानी मुंबईत न्याय मागण्यासाठी आली असताना, मुंबईचे कर्तेधर्ते समजणारे आणि राज्याच्या सत्तेतील वाटेकरी असणारे उद्धव ठाकरे मात्र राम मंदिर उभारणीच्या मुद्द्यावर उत्तर प्रदेशातील अयोध्येत दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातून शिवसेनेवर टीका होत आहे.

शिवसेनाही सत्तेत आहे आणि राम मंदिर बांधण्याचा प्रश्नही ते सत्तेला विचार आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या या दुटप्पी धोरणावर सर्वजण टीका करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या :

राम मंदिर भाजपचा चुनावी जुमला : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे