ईव्हीएमचा घोटाळा असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, हरियाणा निकालावरुन राऊत यांची टीका

| Updated on: Oct 12, 2024 | 8:01 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात बोलताना भाजपवर जोरदार टीका केली. हरियाणाच्या निकालावर देखील त्यांनी टीका केली आहे. काय म्हणाले संजय राऊत जाणून घ्या.

ईव्हीएमचा घोटाळा असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, हरियाणा निकालावरुन राऊत यांची टीका
Follow us on

दसरा मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. यावेळी संजय राऊतांनी म्हटले की, ‘आदित्य ठाकरे तुम्ही दसरा मेळाव्यात पहिलं भाषण केलं. ही नव्या पर्वाची सुरुवात आहे. मुलाने वडिलांसमोर भाषण केले नाही ही परंपरा आहे. पण तुम्हाला सांगतो आता तुम्ही लहान मुलं नाही. तुम्ही राज्याचे आणि देशाचे नेते आहात. तुम्ही मगाशी लढणार का विचारलं, जेव्हा जेव्हा ठाकऱ्यांच्या तीन पिढ्यांनी आवाहन केलं लढणार का तेव्हा हा महाराष्ट्र फक्त ठाकऱ्यांच्याच मागे राहिला आहे. प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील. आता तुम्ही आवाहन केलं आहे. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्र लढायला तयार आहे. मशाल हे एनिमी ऑफ डार्क आहे. अंधार दूर करणारी ही मशाल आहे.’

‘निकाल लागला हरियाणात आणि पेडे वाटताय फडणवीस. सकाळी १० पर्यंत काँग्रेस आघाडीला आहे. बारा वाजता भाजपने सरकार बनवलं. जो काँग्रेस पक्ष ७२ जागावर आघाडीवर होता. तो १२ वाजता कसा आघाडीवर येतो. फक्त ०.६ मतांमुळे भाजपला फायदा कसा झाला. हा ईव्हीएमचा घोटाळा असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. हरियाणात घडलं ते महाराष्ट्रात घडणार नाही. काही लोकं महाराष्ट्र लूटायला आले आहेत. ही लूट वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे यांच्या हातात सत्ता द्यावी लागेल. कावळ्यांकडे दिला सरकार… अशी घाण या लोकांनी केली आहे.’

‘गुजरातमध्ये दोन लोकं जन्माला आली. औरंगजेब आणि जिना. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. महाराष्ट्राला इतिहास आहे बाकीच्यांना भुगोल आहे. धारावीची जमीन मोदी सरकारने अडाणीच्या घशात घातली. महाराष्ट्राची संपत्ती गुजरातला दिलं जातंय. महाराष्ट्राची लूट सुरु होत आहे. महाराष्ट्रातील अनेक बिबळे आता गुजरातला घेऊन चालले आहे. गुजरातला पार्क करायचे आहे. आणखी काय घेऊन जायचं बाकी आहे.’

‘देशातील न्यायव्यवस्था निकली गेली आहे. सरन्यायाधीश मोदींसोबत आरती करत आहेत. सरन्यायाधीश साहेब आपण महाराष्ट्रात जे घटनाबाह्य सरकार आहे ते पाहता आपल्याला झोप कशी लागते असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आपल्याला जर हे सगळं संपवायचं असेल आणि नवीन पहाट आणायची असेल तर मशाल घराघरात पोहोचवावा लागेल.’