मुंबईतील सर्वात महागड्या जागेत या व्यक्तीने खरेदी केला वाडा, किंमत ऐकून चक्रावून जाल

| Updated on: Aug 07, 2024 | 7:20 PM

मुंबई ही देशात सर्वात महाग शहरांंपैकी एक आहे. मुंबईत अनेक असा परिसर आहे जेथे घर खरेदी करणं कोणालाही शक्य नाही. या भागात मोठे मोठे लोकंच राहतात. मुंबईतील कफ परेड या भागात एका उद्योजकाने वाडा खरेदी केला आहे. ज्याची किंमत ऐकून तुम्हाला ही विश्वास बसणार नाही.

1 / 7
पूनावाला अभियांत्रिकी समूहाचे अध्यक्ष आणि दिग्गज उद्योगपती योहान पूनावाला यांनी दक्षिण मुंबईतील कफ परेडमध्ये एक आलिशान वाडा विकत घेतला आहे.

2 / 7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वाड्याची किंमत 500 कोटी रुपये आहेत. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, ही हवेली 30,000 स्क्वेअर फूट परिसरात आहे.

3 / 7
दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात अनेक बड्या उद्योजकांची घरे आहेत. मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांचे एक घर येथे आहे. जेथे पूर्वी ते आपल्या कुटुंबासोबत राहत होते.

4 / 7
पुनावाला दाम्पत्याने ही मालमत्ता खरेदी केल्याचं कुठेही अधिकृत समोर आलेलं नाही. पण, मुंबईतील वाढत्या मालमत्तेच्या किमती लक्षात घेता हा सौदा 500 कोटींमध्ये झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

5 / 7
योहान पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांचे चुलत भाऊ आहेत. योहान पूनावाला आणि त्यांची पत्नी मिशेल पूनावाला सध्या पुण्यातील पूनावाला हाऊसमध्ये राहतात.

6 / 7
योहान पूनावाला यांची पत्नी मिशेल पूनावाला या MYP डिझाइन स्टुडिओ नावाचा इंटिरियर डिझायनिंग स्टुडिओ चालवतात. या नव्या हवेलीचे डिझायनिंग देखील त्या करणार असल्याचं म्हटले जात आहे.

7 / 7
५२ वर्षीय योहान पूनावाला हे एल-ओ-मॅटिक इंडियाचे मालक आहेत. याशिवाय ते सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे शेअरहोल्डर देखील आहेत. ते पूनावाला फायनान्शियलचे अध्यक्षही आहेत. भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव आहे.