मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज नवा बॉम्बगोळा टाकला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी उद्या मंगळवारी ईडीमध्ये रितसर तक्रार नोंदवणार असून परवा केंद्रातील विविध तीन यंत्रणांना याबाबतचे 2700 पानांचे पुरावे देणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. (tomorrow i will file complaint against hasan mushrif in ED, says kirit somaiya)
सोमवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ते दोन नेते कोण? असा सवाल केला जात होता. त्यावरचा सस्पेन्स आज उठला. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा भ्रष्टाचार बाहेर काढला. तर शिवसेनेच्या मंत्र्याचा भ्रष्टाचार नंतर जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं.
हसन मुश्रीफ आणि परिवारांनी सरसेनानी संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये 100 कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला आहे. हे मी जबाबदारीने सांगत आहे. याबाबत उद्या मी मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. 2700 पानांचे पुरावे देणार आहे. परवा दिल्लीला फायनान्स मिनिस्ट्री, ईडी, कंपनी मंत्रालय यांच्याकडेही हे सर्व पुरावे देणार आहे. ठाकरे सरकारची डर्टी इलेव्हन घोटाळ्यात राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे दोन मंत्र्याच्या फाईल तयार होत्या. आज एनसीपीच्या मंत्र्यांचा घोटाळा उघड केला. कालांतराने दुसऱ्या मंत्र्याचा घोटाळा उघड करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. फक्त तेव्हढचं नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे 2700 पेजेसचे पुरावे आहेत, ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत. बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि. ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे, असं त्यांनी सांगितलं.
बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत. हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत. (tomorrow i will file complaint against hasan mushrif in ED, says kirit somaiya)
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 13 September 2021 https://t.co/rcDScOKSPv #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2021
संबंधित बातम्या:
Assam Rifle Recruitment 2021: आसाम रायफल्समध्ये 1230 जागांवर भरती, टेक्निकल आणि ट्रेडसमन पदांवर भरती
(tomorrow i will file complaint against hasan mushrif in ED, says kirit somaiya)