मुंबई: कोरोनाच्या संसर्गामुळे (corona) मुंबईसह (mumbai) राज्यात अनेक ठिकाणी बेडचा तुटवडा झाला होता. अनकांना बेड मिळणं दुरापस्त झालं होतं. लोकांमधून संताप व्यक्त केला जात होता. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे राज्याचे मंत्री मात्र कोरोना झाल्याने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उपचार घेत होते. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व मंत्री जनतेच्या पैशातूनच उपचार घेत होते. रुग्णालयातील उपचाराच्या खर्चाचं बिलही या मंत्र्यांनी सरकारकडे सादर केलं आहे. लाखोंचं हे बिल आहे. त्यामुळे या मंत्र्यांची पोलखोल झाली आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक बिलं आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांचेच आहे. त्यांनी उपचारावर 34 लाख 40 हजार 930 रुपयांचा खर्च झाल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
कोरोना काळात आघाडी सरकारमधील एकूण 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. दोन वर्षात या मंत्र्यांनी उपचार घेतल्याची बिलं राज्य सरकारला सादर केली आहे. या सर्व मंत्र्यांच्या उपचारापोटी शासनाने 1 कोटी 39 लाख 26 हजार 720 रुपये भरले आहेत. सरकारी नियमानुसारच हे बील भरण्यात आलं आहे. मात्र, ज्यावेळी जनता सरकारी रुग्णालयात उपचार घेत होती, तेव्हा मंत्री मात्र फाईव्ह स्टार हॉटेलात उपचार घेत होते. त्यामुळे मंत्र्यांचा सरकारी रुग्णालयांवर विश्वास नाहीये का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही खासगी रुग्णालयात उपचार घेतले. टोपे यांनी या दोन वर्षात 34 लाख 40 हजार 930 रुपये बिलांची पूर्तता केली आहे. त्यांनी दोन वर्षात बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. त्यामुळे टोपेंचा सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही का? असा सवाल केला जात आहे.
दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना काळात आपण रुग्णालयात दाखल झालो नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कारोना काळात मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो नव्हतो. मी घरात होतो. मागच्या वर्षी हॉस्पिटल admit झालो होतो. माझा हार्ट इश्यू होता त्यासाठी दाखल झालो होतो. सोय उपलब्ध करून दिली तर सर्व उपचार घेतात. पण मी कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालो नव्हतो, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
>> हसन मुश्रीफ 14 लाख 56 हजार 604
>> जयंत पाटील, 7 लाख 30 हजार 513
>> अनिल परब, 6 लाख 79 हजार 606
>> अब्दुल सत्तार, 12 लाख 56 हजार 748
>> सुनील केदार, 8 लाख 71 हजार 890
>> जितेंद्र आव्हाड, 11 लाख 76 हजार 278
>> राजेश टोपे, 34 लाख 40 हजार 930
>> सुभाष देसाई, 6 लाख 97 हजार 293
>> छगन भुजबळ, 9 लाख 3 हजार 401
>> डॉ. नितीन राऊत, 17 लाख 630 हजार 879
>> विजय वडेट्टीवार, 2 लाख 4 हजार 45
>> सुनिल केदार, 1 लाख 15 हजार 521
>> नवाब मलिक, 26 हजार 520
>> अशोक चव्हाण, 2 लाख 28 हजार 184
>> दत्तात्रेय भरणे, 1 लाख 5 हजार 886
>> प्राजक्त तनपुरे, 38 हजार 998
>> के. सी. पाडवी, 1 लाख 25 हजार 284
>> संजय बनसोडे, 2 लाख 20 हजार 661
>> केईएम हॉस्पिटल 1 लाख 5,886
>> आधार हॉस्पिटल 88 हजार 466
>> अवंती हॉस्पिटल 7 लाख 56,369
>> बॉम्बे हॉस्पिटल 41 लाख 38,223
>> अनिदीप हॉस्पिटल 1 लाख 80 हजार
>> ग्लोबल हॉस्पिटल 4 लाख 65,874
>> जसलोक हॉस्पिटल 14 लाख 55,96
>> फोर्टिस हॉस्पिटल 11 लाख 76,278
>> लिलावती हॉस्पिटल 26 लाख 27,948
>> ब्रीच कँण्डी हॉस्पिटल 15 लाख 37,922
संबंधित बातम्या: