पालघर : ‘देव तारी त्याला कोण मारी’… मराठीतील ही म्हण काही प्रसगांना हुबेहूब लागू होते. आता ही म्हण ज्या प्रसंगाला लागू झालीय ती घटना विरारच्या अर्नाळा परिसरात घडली आहे. अर्नाळ्याच्या विसावा रेसॉर्ट येथे कस्टमरला घेवून जाण्यासाठी आलेल्या रिक्षावर एक भलंमोठं नारळाचं झाड पडलं. यात रिक्षाचा चेंदा झाला. परंतु सुदैवाने रिक्षाचालक यात वाचलेला आहे. याची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (tree fell on the rickshaw, Damage of rickshaw But the driver luckily Survived the Accident in Virar)
हॉटेल विसावा या रिसॉर्ट मध्ये 26 जुलैला सोमवारी दुपारी 4 च्या दरम्यान ही रिक्षा कस्टमरला नेण्यासाठी आली होती. कस्टमरची वाट बघण्यासाठी त्याने रिक्षा पार्किंग मध्ये उभी केली होती. अचानक नारळाच झाड रिक्षावर कोसळलं. रिक्षात केवळ रिक्षाचालकच होता.
रिक्षा दोन ते तीन इंच मागे असती तर कदाचित या रिक्षावाल्याच्या अंगावर झाड पडल असतं. पण नशीब बलवत्तर म्हणून हा रिक्षावाला वाचलेला आहे. रिसॉर्टच्या मालकाने रिक्षाचालकाला 6 हजारची आर्थिक मदत ही केली आहे. सद्या रिक्षाला दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये टाकण्यात आलं आहे.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर देव तारी त्याला कोण मारी, फक्त एवढंच वाक्य तोंडातून येतंय. एकदा जर ‘उपरवाल्याने’ ठरवलं तर कितीही मोठं संकट आलं तर माणूस त्या संकटातून बाहेर निघतोच, असंच यानिमित्ताने म्हणावं लागेल.
पाहा व्हिडीओ :
(tree fell on the rickshaw, Damage of rickshaw But the driver luckily Survived the Accident in Virar)