मुंबई: नेपाळमध्ये (nepal) काल झालेल्या विमान दुर्घटनेत एकूण 22 लोक प्रवास करत होते. त्यात चार भारतीयही होते. या विमानाचा अचानक संपर्क तुटला आणि विमान गायब झाला. बऱ्याच तासानंतर या विमानाचा काही भाग सापडला. मात्र, विमान सापडले नाही. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवासी ठार झाल्याचं सांगितलं जातं. नेपाळच्या विमान आणि सिक्कीमच्या कार दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी आणि पुनामिया कुटुंबातील सर्व सदस्य ठार झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी या सदस्यांचा मृत्यू झाल्याचं ट्विट केलं आहे. त्यामुळे ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्रिपाठी (tripathi) आणि पुनामिया कुटुंबीयांचे मृतदेह मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे मृतदेह कधीपर्यंत भारतात आणले जातील याबाबतची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, नेपाळ सरकारकडून या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.
नेपाळ मधील विमान तसेच सिक्कीम मोटार दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी व पूनमिया या दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील सर्व सदस्य त्यात लहान बालकांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे…
पर्यटकांसाठी असलेल्या सुरक्षिततेची पूर्तता अत्यावश्यकच आहे#भावपूर्णश्रद्धांजली— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 30, 2022
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही दु:खद माहिती दिली आहे. नेपाळमधील विमान तसेच सिक्कीम मोटार दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी व पूनमिया या दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील सर्व सदस्य त्यात लहान बालकांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. पर्यटकांसाठी असलेल्या सुरक्षिततेची पूर्तता अत्यावश्यकच आहे, असं आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.
या विमानातून चार भारतीय आणि 3 जापानी नागरिक प्रवास करत होते. इतर सर्व नेपाळी नागरिक या विमानातून प्रवास करत होते. चालकासह 22 प्रवाशी या विमानातून प्रवास करत होते. हे दोन इंजिनचं विमान होतं. मस्तंग जिल्ह्यात हे विमान शेवटचं पाहिलं गेलं. त्यानंतर हे विमान धौलागिरी पर्वताच्या दिशेने जाताना दिसलं. त्यानंतर हे विमान अचानक गायब झालं.
विमानात तीन पायलट होते. कॅप्टन प्रभाकर घिमिरे, फ्लाईट अटेंडेंट किस्मत थापा आणि उत्सव पोखरेल आदींचा यात समावेस होता. या गायब झालेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी दोन विमान तैनात करण्यात आले आहेत. तसेच विमानाचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरही तैनात केलं जाणार आहे. जोमसोम येथील घासामध्ये मोठ्ठा आवाज ऐकू आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विमानाचा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही पृष्टी करण्यात आली नाही. या परिसरात एक हेलिकॉप्टर पाठवून शोध घेतला जात आहे. लेटे येथे या विमानाचा शेवटचा संपर्क झाला होता असं सांगितलं जात आहे.