टीव्ही ९ मराठीच्या ‘इन्फ्रा अँड हाऊसिंग कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलताना SRA सचिव संदीप देशमुख यांनी म्हटले की, ‘आमचा मूळ उद्देश झोपडपट्टी मुक्त मुंबई असा नाही. झोपडपट्टीतील लोकांना चांगलं पक्कं घर देणं हा आहे. चांगलं घर दिलं तर लोकांना झोपडपट्टीत राहण्याची गरज पडणार नाही. घर हा अभिमान असतो. स्वप्न असतं. आम्ही झोपडपट्टीतील लोकांना स्वप्न आणि अभिमान देत आहोत. घरांचा जो आकार आहे. तो राष्ट्रीय मानकांप्रमाणे घेतो. आता ३०० स्क्वेअर फूट तो पंतप्रधान आवास योजनेतून घेतला आहे. आम्ही त्यामुळेच झोपडपट्टीधारकांना घर देतो. राष्ट्रीय स्तरावर मानकं बदलली तर आम्हीही मानकं बदलू.’
‘घर देताना आधी ज्या ठिकाणाहून झोपडीधारक आले त्यापेक्षा चांगलं घर देण्याचं काम करत आहोत. वायू नियोजन वगैरे असणारी घरे देत आहोत. विक्री घटक आणि पूनर्वसन घटक यात ५०-५० टक्के वाटप व्हावं. विक्री घटकातील लोकांना ज्या सुविधा आणि दर्जा आहेत. तोच देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
‘आम्ही पूर्ण मुंबईचा ड्रोन सर्व्हे केला आहे. आम्ही ३ हजाराहून अधिक झोपड्यांचे क्लस्टर आयडेंटिफाय केले आहेत. त्या कल्स्टरमध्ये काही लहान आहे. काही मोठे आहे. काही पाच पाच हजाराचे क्लस्टर आहे. काही २५ ते ३० झोपड्यांचे क्लस्टर आहे. जे क्लस्टर आर्थिक दृष्ट्टया लोकांना व्हायबल होत नाही ते करत नाही. विकासकांना फायदा नसेल तर ते करत नाही. आम्ही २ लाख घरांचा संकल्प ठेवला आहे. आम्ही विविध शासकीय संस्थांशी मिळून दोन लाख घरांचा पुनर्विकास करत आहोत. ज्या घरांचा पुनर्विकास होणार नाही, त्यासाठी इतर संस्थांशी समन्वय करून ना नफा ना तोटा तत्त्वावर विकास करू.’