पुण्यात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात या योजनेचा होणार शुभारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार 29 आँगस्ट रोजी चिपळूण दौऱ्यावर जाणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ या दौऱ्यात ते फोडणार आहे. राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु आता पुढील पाच दिवसांत पुणे जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण हळूहळू वाढत जाणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
भर रस्त्यात पाच ते दहा जणांच्या टोळीने रस्त्यात गाडी लावली म्हणून गोदाम मालकाला बेदम मारहाण केली होती. गोदाम मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मारहाणीचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. डोंबवलीत 15 दिवसांआधी भर रस्त्यात रिक्षा लावण्याच्या वादातून चालकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता रस्त्यात गाडी लावल्याच्या वादातून हत्या झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कथित MUDA घोटाळ्यात सीएम सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास कर्नाटकच्या राज्यपालांनी परवानगी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “सर्व पैलू आणि कायदेतज्ज्ञांचे मत विचारात घेतल्यानंतर राज्यपालांनी सीएम सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. ही कायद्याची योग्य प्रक्रिया आहे. सीएम सिद्धरामय्या यांनी तपास यंत्रणा आणि न्यायपालिकेला सहकार्य करावे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.”
बंगालमधील घटनेमुळे संपूर्ण देश चिंतेत आणि संतप्त आहे, तरीही टीएमसी सरकार आपल्या बचावात याला धार्मिक आणि राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे, असे बसपा प्रमुख मायावती यांनी सांगितलं. विरोधकही या बाबतीत कमी नाहीत. अशा स्थितीत दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय कसा मिळेल, ही चिंता सतावत आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच जननायक जनता पक्षात (जेजेपी) बंडाळी सुरू झाली आहे. हरियाणातील टोहाना येथील जेजेपीचे आमदार आणि माजी मंत्री देवेंद्र बबली यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. एक दिवसापूर्वीच पक्षाचे आणखी एक आमदार आणि माजी मंत्री अनूप धनक यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि JMM नेते चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अफवांवर सांगितले की, अफवा आहेत की नाही हे आम्हाला माहित नाही. जर आम्हाला बातम्या माहित नसतील तर आम्ही सत्य आणि असत्य कसे ठरवणार? आम्हाला काही माहिती नाही. आपण आहोत तिथेच आहोत.
पुण्यात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभात नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांवर मोठा हल्लाबोल केला. ही योजना आल्यापासून अनेकांना अनेक आजार जडल्याचा चिमटा त्यांनी काढला. कोणाचे पोटदुखत आहे. तर काहींना कावीळ झाल्याचा टोला त्यांनी लगावला.
दुर्दैवी घटना घडली, महांतांकडून एक विधान देण्यात आले. पण सरकार गुलाबी रांगाखाली लपणार नाही, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. याच महंतांनी 2018 साली मुस्लिम समाज धर्मगुरूंना मंचावर बसवून कीर्तन करत होते, आज सरकार जाणार म्हणून हे सगळं घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ श्रीरामपुरातील गोंडेगाव बंदची हाक दिली. महंत रामगिरी समर्थकांनी गाव बंद ठेऊन निषेध केला. श्रीरामपूर तालुक्यातील रामगिरी समर्थक आक्रमक झाले. श्रीरामपूरातील निमगाव खैरी येथे रास्ता रोको तर गोंडेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. रामगिरी महाराजांच्या बदनामीचे षड्यंत्र बंद करा ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.
आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष अजित पाटके पाटील आणि त्यांचे पदाधिकारी जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटी मध्ये दाखल झाले आहेत. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचा निरोप घेऊन आपचे पदाधिकारी अंतरवाली सराटी मध्ये दाखल झाले. विधानसभा निवडणुकी संदर्भात जरांगे पाटील आणि आपच्या पदाधिकाऱ्या मध्ये चर्चा झाली.
वन नेशन वन इलेक्शन संदर्भात विरोधकांना कदाचित वाचता येत नसेल. कदाचित विरोधकांची समजूत घेण्याची कुवत नाही. वन नेशन वन इलेक्शन साठी कमिटी नेमली आहे. त्या कमिटीची अंमलबजावणी झाल्यानंतर एकत्रित निवडणुकीचा प्रस्ताव आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
कॅन्सर रुग्णांसाठी असलेले रिडियोएक्टिव मटेरियल लखनऊ विमानतळावर लीक झाले. त्यानंतर कार्गो एरिया रिकामा करण्यात आला. घटनास्थळावर एनडीआरएफची टीम पोहचली आहे. विमानतळावर रेडियोएक्टिव मटेरियल लीक झाल्याने दोन कर्मचारी बेशुद्ध झाले. दीड किमीपर्यंत भाग यानंतर रिकामा करण्यात आला.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. मोर्चा साठी राज्यभरातील हजारो कर्मचारी उपस्थित आहेत. शहरातील टाऊन हॉल बाहेरून निघालेला विराट मोर्चा जिल्हाधकारी कार्यालय आवरात पोहचला आहे.
वाशीतील इनॉर्बिट मॉल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर संपूर्ण मॉल रिकामा करण्यात आला असून शोध सुरू आहे.
विनोद तावडे यांच्यावर भाजप कडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रमुख विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली.
विनोद तावडे यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी. आजपासून भाजप सदस्यता नोंदणी अभियान सुरू करत आहे.
खतांच्या गोणींवर मोदींचा फोटो, खत त्यांनी तयार केलंय का ? खतांच्या गोणींवर त्यांचा फोटो कशासाठी ? उद्धव ठाकरे यांचे राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र
आपल्यावरील संकट आजही गेलेलं नाही, रोज नवी संकटं येत आहेत. आताच्या सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मुंबई संपवणं हे अतिशय घाणेरडं राजकारण आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
राजधानी जवळचे दोन मॉल बॉम्ब उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गुरुग्राम मधील ॲम्बिंयंस मॉल आणि नोएडा मधील डीएलएफ मॉल उडवण्याची धमकी मिळाली असून हे दोन्ही मॉल रिकामे करण्यात आले. फायर ब्रिगेड आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोध सुरू आहे. मात्र धमकीचा हा मेल खरा आहे की मॉक ड्रिल याबाबत चर्चा सुरू आहे.
बांगलादेशातील घटनेचा राग इथे काढण्याची काही गरज नव्हती. बांगलादेशातील घटनेवरून इथल्या लोकांचं जगणं विस्कळीत का करायचं असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.
राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. सर्वच समाजांनी सामंजस्य राखण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी नमूद केले.
सरकारला 4 राज्यांच्या निवडणुकाही घेता येत नाहीत. वन नेशन वन इलेक्शनवरून शरद पवार यांनी टोला लगावला.
भाजपची आज सदस्यता अभियानासंदर्भात बैठक. या बैठकीला चार राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना हजर राहण्याबाबत सूट. महाराष्ट्र, हरियाणा जम्मू-काश्मीर आणि झारखंड राज्यातील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना गैरहजर राहता येणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आजच्या बैठकीला दिल्लीत सहभागी होणार नाहीत. इतर प्रभारी मात्र आजच्या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती
लखनऊ विमानतळावर फ्लोरिन गॅसची गळती. गॅस गळतीमुळे दोन कर्मचारी बेशुद्ध. दीड किलोमीटरचा परिसर रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू. कार्गो परिसरात वैद्यकीय सेवेसाठी वापरला जाणाऱ्या फ्लोरिन गॅसला गळती. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ घटनास्थळी दाखल.
“आत्ताच्या घडीला भाजपने संपूर्ण देश लुटला आहे. देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले आहे आणि याला साथ देण्याचे काम आमच्यातून गेलेले गद्दार करत आहेत. त्यामुळे या भाजपला महाराष्ट्रातून हटवणे पहिले टार्गेट आहे. भाजपला हटवले तरच मुख्यमंत्री आपला होईल. मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी मध्ये कोणताही वाद नाही” असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
सोलापुरात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आरोग्य सेवेतील संघटनांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलाय निषेध मोर्चा. देशातील महिला डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी सुरक्षित नसल्याची भावना. सोलापुरातील चार हुतात्मा स्मारक ते नोकरी हॉस्पिटल पर्यंत काढला मोर्चा.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपाने असंख्य शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीचे महत्त्व कमी करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले, अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली. मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करायची? याची परिसीमा त्यांनी ओलांडली आहे, असे आमदार प्रसाद लाड म्हणाले.
नंदुरबार – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकेत महिलांची मोठी गर्दी….
शहरी आणि ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणावर योजनेच्या लाभ घेण्यासाठी शहरात दाखल
बँकेत सायबर कॅफे या ठिकाणी महिलांची पैसे काढण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे.
अमरावतीत डॉक्टरांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन
कोलकत्ता येथील झालेल्या अत्याचार हत्या केल्याप्रकरणी डॉक्टरांनी काम बंद करून केला निषेध..
हातावर लाल टिकली लावून केला निषेध..
अमरावतीच्या बाबासाहेब आंबेडकर चौकात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांचे निषेध आंदोलन..
दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली..
यूपीएससीकडून लॅटरल एंट्रीसाठी जाहिरात
केंद्र सरकारच्या विविध विभागात दहा सहसचिव पदासाठी थेट भरती
तसेच उपसाचिव आणि संचालकपदावरील ३५ जागांसाठी जाहिरात
आजपासून १७ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत
खासगी कंपन्या, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच पीएसयू मध्ये काम केल्याचा अनुभव असलेल्यांना मिळणार संधी
केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकारी – कर्मचारी या पदांसाठी पात्र नाहीत
पुण्याच्या खेड तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सुरू… सन्मान जनतेचा, मार्ग लोक कल्याणाचा हा विचारमंत्र घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा खेड तालुक्यात… राजरत्न हॉटेल ते मार्केट यार्ड राजगुरूनगरपर्यंत भव्य रॅली सुरू… राजगुरूनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमध्ये भव्य सभा होणार…
राज्यात डॉक्टरांच्या संपाचा 5 वा दिवस… संभाजीनगरमध्ये सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रिया रखडल्या… घाटी रुग्णालयातील 532 डॉक्टरांचा संपात सहभाग… मिनी घाटी रुग्णालयातील 32 डॉक्टरांचा संपात सहभाग…
हरण्याच्या भीतीनं फडणवीसांकडून लोकांना धमक्या… फडणवीसांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही… फडणवीसांनी सुडाचं राजकारण सुरु केलंय… पराभवाची भीती दिसत असल्याने फडणवीसांची झोप उडाली आहे… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
कोलकत्ता घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये शेकडो डॉक्टर रस्त्यावर… घटनेची सीबीआय चौकशी करून आरोपीला फाशी देण्याची मागणी… तपासात पोलिसांनी हलगर्जी केल्याचा डॉक्टर आंदोलकांचा आरोप… डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून खून केल्या प्रकरणी देशभरात पडसाद…
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरबरा पोहचला सात हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल वर… मात्र शेतकऱ्यांकडे हरबरा नसल्याने व्यापाऱ्यांचा फायदा… वर्षभर हरभऱ्याला मिळाला होता केवळ 5 हजार रुपये भाव… तर हमीभाव होता 5 हजार 440 रुपये…. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरबऱ्याची आवक घटल्याने बाजार भाव वाढले..
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलवर पोहचला आहे. मात्र शेतकऱ्याकडे हरभरा नसल्याने व्यापाऱ्यांचा फायदा होत आहे. वर्षभर हरभऱ्याला केवळ 5 हजार रुपये भाव मिळाला होता. तर हमीभाव 5 हजार 440 रुपये होता. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक घटल्याने बाजार भाव वाढले आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतची निवड प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. आज दुपारी भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. अमित शाह, राजनाथ सिंह, जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. बैठकीच्या समारोपा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कपिल पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर कपिल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. समाजामध्ये एकोपा राहिला पाहिजे, यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, यासाठी मी नेत्यांशी बोलत असतो. आज राज ठाकरेंची भेट घेतली, असं ते म्हणाले.
साबरमती एक्सप्रेसच्या घटनेची चौकशी आयबी करणार आहे. दिल्ली कानपूर एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरले. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
नाशिकमध्ये शनिवारी तणावपूर्ण शांतता आहे. या भद्रकाली परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. दगडफेक झालेल्या परिसरातून आज कावड यात्रा गेली.
रामगिरी महाराजाच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये मोर्चा निघणार आहे. यासंदर्भातील पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोदी सरकारने 2021 साली सीएए कायद्याला मंजूर दिली होती. हा कायदा प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात लागू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानातून आलेल्या 58 पीडित सिंधी बांधवांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने”चा राज्यस्तरीय शुभारंभ शनिवार दि.17 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 ते 4 यावेळेत पुण्यात होत आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे.