महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 25 जूनला बैठक होणार आहे. आगामी चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बैठकांना सुरूवात झाली आहे. पुणे ड्रग्स प्रकरणत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखीन एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस सहनिरीक्षक पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेल की बेल? याचा निर्णय आज दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. भाजपकडून लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे लोकसभेच उपाध्यक्ष विरोधी पक्षाला मिळावे अशी मागणी इंडिया आघाडीने केली आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील एकूण 26 हॉटेल रेस्टॉरंटवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. यापुढेही शहरातील अनधिकृत बार रेस्टॉरंट बरोबर कारवाई केली जाणार आहे. एकूण 37 हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामावर पालिकेने तोडक कारवाई केली.
सोलापूर : MIM पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाने सोलापूरमध्ये जोडे मारो आंदोलन केले. असदुद्दीन ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जय फिलिस्टीनचा (पॅलेस्टाईन) नारा दिला होता. त्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आले.
भाजप खासदार कंगना रणौत म्हणाली, “जे लोक आज संसदेत संविधानाचे पुस्तक उचलून ओरडत आहेत, नाटक करत आहेत, त्यांची काळी कृत्ये 6 सप्टेंबरला उघड होतील. ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट मी माझे घर आणि दागिने गहाण ठेवून बनवला आहे.”
आज रात्री 8 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी दिल्लीतील भारतातील आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्याच्या जामिनावरील स्थगिती कायम राहणार आहे. राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयावरील स्थगिती उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आणि यावेळी त्यांच्या हातात संविधानाची प्रत होती. राहुल गांधी यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांनी ‘जय हिंद, जय संविधान’चा नाराही दिला.
पुण्यातील एल 3 बारवर महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांना उस्मान अली म्हणावं का असा संशय आहे. यांनी आता फक्त नमाज पडायचे बाकी ठेवले आहे. हे दोघे बाप लेक उद्या हजला जाण्यासाठी सुद्धा अर्ज करू शकतात. अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे.
पुण्यातील कल्याणीनदगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. पोर्शे कारने त्याने दोन जणांना उडवले होते. ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.
शिक्षक मतदार संघाचे पैसे वाटप करण्याच्या तयारीत असतांना दोघांना ताब्यात घेतलं आहे. मनमाड पोलीस आणि आचारसंहिता उल्लंघन पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे. मनमाड गणेश नगर भागात एका बंगल्यात पैसे वाटले जाणार होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारला. बंगल्यातून अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे प्रचार साहित्य व पैश्यांचे पाकिटे जप्त केले. निवडणुकीला एक दिवस बाकी असतांना कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
थोड्याच वेळात काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. काँग्रेस मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकांची तयारी आणि विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. बैठकीसाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, सुनील केदार, यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल झाले आहेत. आज दुपारी चार वाजता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत हंटर मोर्चा काढण्यात आला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावा, यासह विविध मागणीसाठी मोर्चा काढला गेला आहे. स्टेशन चौकातून मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चाच्या संदर्भात माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी ध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी केली.
पाण्यासाठी नागरिकांचा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला आहे. नागरिकांचा रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ महिलेला चक्कर आली. पाणी येत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा संतप्त नागरिकांनीचा पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे.
जरांगे यांना पाचवीच्या वर्गात ऍडमिशन दिलं पाहिजे. उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांचा टोला. जरांगे यांचं वय आहे का आता शिकायच. ज्या वेळेला शिकायचं होत त्या वेळी शिकला नाही, चुकीचं कामं करत बसला, असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले.
75 वेळा संविधानमध्ये काँग्रेसने बदल केला याबाबत काँग्रेसने बोलावे. यंदाच्या लोकसभेत काँगेसने खोटा प्रचार केला संविधान बदलणार असा प्रचार केला आमच्या प्रश्नावर काँगेसने उत्तर द्यावे
सदाभाऊ खोत यांनी मोठे भाष्य केले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, काही ठिकाणी अनियमित पाऊस झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज मिळताना दिसत नाहीये.
लक्ष्मण हाके यांचं ओबीसी तरुणांना आवाहन. आपली लढाई कायद्याने लढायची आहे. निवडणूक काळात या गोष्टी करा. सध्या कोणालाही विरोध करू नका. विधानसभा निवडणूक काळात गाव बंदी करा
“राज्यात जे चाललय ते चांगलंच आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला वातावरण नसेल. सरकारच यापुढेही चांगलचं सुरु रहाव. राज्यात महायुतीची सत्ता येईल. जागा वाटपावर वरच्या टप्प्यात चर्चा होईल” असं शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले.
इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांनी अर्ज भरला. लोकसभा अध्यक्ष पदासाठी उद्या सकाळी 11 वाजता मतदान. एनडीएकडून ओम बिर्ला यांनी अर्ज भरला.
पुण्यातील L-3 हॉटेलमधील ड्रग्ज प्रकरण. ड्रग्ज सेवन करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात. पुणे पोलिसांनी तरुणाला मुंबईतून घेतलं ताब्यात.
विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांचे नाव चर्चेत. पडत्या काळात पक्षासाठी शरद कोळी यांनी मोठे योगदान दिल्याने कोळींच्या नावाची चर्चा. शरद कोळी समर्थकांकडून सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट. पक्ष फुटीनंतर पहिला पक्षप्रवेश शरद कोळींचा झाल्याने विधानपरिषद मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी.
मोठी बातमी समोर आली आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात पोलिसांनीच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असलेलं पोस्टर फाडलं आहे. कोल्हापूरच्या माणगाव मध्ये हा प्रकार घडला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने माणगावमधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला निवेदन देण्याचे आंदोलन केलं होतं. आंदोलनासाठी आणलेलं पोस्टर पोलिसांनी आंदोलनाआधीच फाडलं. निरीक्षक अशोक सायकर यांनी पोस्टर फाडलंय.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने L 3 बारवर केलेल्या कारवाईचा व्हिडिओ समोर… आरोपींना अटक करतानाचा व्हिडिओ आला समोर… राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधित हॉटेल सील करत परवाना करण्यात आला रद्द… L3 मधून 241 लिटर विदेशी मद्य राज्य उत्पादनशील विभागाकडून जप्त
उज्ज्वल निकम यांच्यावर भाजपचा शिक्का… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
कंगना यांनी केलेली मागणी मुर्खपणा आहे… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. कंगना यांनी महाराष्ट्रा सदनातील सीएमची खोली मागितली होती.
झारखंडच्या रांचीमध्ये आरएसएसच्या प्रांत प्रचारकांची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ११ ते १३ जुलैदरम्यान रांचीमध्ये ही बैठक होणार आहे. भाडपचे संघटनन सरचिटणीस बी.एल.संतोष सहभागी होणार…
ओम बिर्ला आज लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात NDA नेत्यांची बैठक सुरु आहे. बैठकीनंतर ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार…
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके आज खासदारकीची शपथ घेणार… शपथ घेण्यापूर्वी लंके यांचे कुटुंब दिल्लीत दाखल… लंके यांचे आई-वडील आणि कुटुंबीय दिल्लीत दाखल… निवडणुकीची लढाई ही जनशक्ती आणि धनशक्ती अशी होती… निलेश लंके यांच्या वडिलांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र शासनाने वारीतील दिंड्यांसाठी 20 हजार चे अनुदान जाहीर केले आहे संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे यांनी शासनाला हा अनुदानाचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली होती. परंतू शासनाने या संदर्भात अनुदानाचे नियोजन करण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार आहे. अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राऊज अव्हेण्यू कोर्टाकडून जामीन देण्यात आला होता. त्यावर ईडीने दिल्ली उच्च न्यायालय गाठले. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने जामीनावर स्थगिती दिली होती. आता अंतिम निकाल आज देणार आहे.
आणीबाणीची आठवण म्हणून लोकशाहीतील काळा दिवस असा अभियान भारतीय जनता पक्ष देशभर राबवणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.
लोकसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. यामुळे लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार हे दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला, डी पुरांदेश्र्वरी यांची नावं चर्चेत आहे.