उद्धव ठाकरे यांचे ‘मिशन ठाणे’ सुरू; थेट एकनाथ शिंदे यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या जम्बो नियुक्त्या

| Updated on: Jan 14, 2023 | 9:25 AM

दैनिक 'सामना'तून या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 'सामना'तून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची पानभर यादीच जाहीर करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांचे मिशन ठाणे सुरू; थेट एकनाथ शिंदे यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या जम्बो नियुक्त्या
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेला सावरण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ठाणे’ हाती घेतलं आहे. या ‘मिशन ठाणे’ अंतर्गत ठाण्यातील शिवसेना कार्यकारिणीवर उद्धव ठाकरे यांनी भाकरी फिरवली आहे. ठाण्यातील संघटकांपासून ते उपविभाग प्रमुखपदी अनेकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी या नियुक्त्यांमधून जुन्यांना समावून घेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं काम केल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याला सुरुंग लावण्यसााठी उद्धव ठाकरे यांनी या नियुक्त्या केल्या असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

दैनिक ‘सामना’तून या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ‘सामना’तून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची पानभर यादीच जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना अधिक महत्त्व आलं आहे. महापालिका निवडणुकीची तयारी करण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्यांदाच नियुक्त्या

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि त्यानंतर राज्यात झालेलं सत्तांतर या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाने संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

ठाण्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सहसमन्वयक, उपविभागप्रमुख, उपशाखाप्रमुख, उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख, विभागप्रमुख, विधानसभा क्षेत्र सचिव आदी पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

महिला आघाडीच्याही नियुक्त्या

याशिवाय महिला आघाडी आणि युवती सेनेच्याही पदांवरही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महिला आघाडी शहर संघटक, महिला आघाडी उपजिल्हा संघटक, उपशहर संघटक, विभाग समन्वयक, विभाग संघटक, उपशाखा संघटक आदी पदांवरील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

तर युवती सेना उपशाखा अधिकारी, विधानसभा क्षेत्र संघटनक, विभाग संघटक, शाखा संघटक, विभाग संघटक आदी पदांवरील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच युवासेना ठाणे जिल्हा समन्वयकपदी अॅड. दीपक गायकवाड (ओवळा-माजिवाडा विधानसभा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.