Uddhav Thackeray : ‘कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या’, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप

| Updated on: Nov 17, 2024 | 9:45 PM

"हे संकट फार मोठं आहे. जसं म्हणतो की आसमानी आणि सुलतानी, तसं आपल्या महाराष्ट्राच्यासमोर अदानीची सुल्तानी हे फार मोठं संकट आहे. अदानीची सुलतानी. आम्ही फेक नरेटिव्ह बोलत असू तर धारावीसाठी या सरकारने जे आदेश काढले आहेत", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Uddhav Thackeray : कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप
उद्धव ठाकरे यांची अदानींचा उल्लेख करत महायुतीवर टीका
Follow us on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बीकेसीत जाहीर प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे महायुती सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाला दिल्याने त्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. महायुती सरकारने फक्त धारावी नाही तर अनेक क्षेत्रात अदानी उद्योह समूहाला प्रकल्प दिल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि चंद्रपूरचंदेखील उदाहरण दिलं. “महायुती सरकार नुसती धारावी नाही तर आख्खी मुंबई ही अदानीच्या घशात घालत आहे. केवळ धारावीच नव्हे, आख्खी मुंबईच नव्हे, तर मुंबईच्या आसपासचा परिसर देखील अदानींच्या घशात घालत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“जिथे जातो तिथे अदानी. म्हणजे मी प्रचाराची सुरुवात केली कोल्हापूरपासून तिथले आपले राधानगरीचे आमदार के. पी. पाटील म्हणाले की, आमच्या इथलं पाणी सुद्धा अदानीला विकलेलं आहे. चंद्रपूरमध्ये गेलो. तिथल्या खाणी आणि शाळा सुद्धा अदानींना दिलेल्या आहेत. आज पालघरला गेलो. तिथलं वाढवण बंदर झाल्यानंतर अदानीला देऊन टाकणार आहेत. विमानतळ अदानी, बंदर अदानी, आपल्याला वीज येते ती महाराष्ट्रभराची विजय अदानीकडे, खाणी अदानीकडे, सगळे उद्योगधंदे अदानीकडे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘अदानीची सुल्तानी हे फार मोठं संकट’

“हे संकट फार मोठं आहे. जसं म्हणतो की आसमानी आणि सुलतानी, तसं आपल्या महाराष्ट्राच्यासमोर अदानीची सुल्तानी हे फार मोठं संकट आहे. अदानीची सुलतानी. आम्ही फेक नरेटिव्ह बोलत असू तर धारावीसाठी या सरकारने जे आदेश काढले आहेत, मिठागर अदानीला, दहीसर टोलनाका अदानीला, मुलुंडचा टोलनाका अदानीला, कुर्ल्याची मदर डेअरी अदानीला. हे सरकारचेच आदेश आहेत. हे तर काही फेक नरेटिव्ह नाहीत. नंतर आपलं सरकार आल्यानंतर मी ते आदेश फेकून फाडून देईन हे सुद्धा मी आज सांगतोय. जणू काही इथे कुणी माणसं राहतच नाहीत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

(हेही वाचा : ‘मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे, तू फार मोठं काम केलंस’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?)