उद्धव ठाकरे अदानींचा गाडा रोखणार? पत्रकार परिषदेतील पाच मुद्दे

| Updated on: Jul 20, 2024 | 1:45 PM

महाराष्ट्र सरकारवर शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे जोरदार टीका केली.  त्यांनी लाडकी बहीण योजनावर उपाहासात्मक टीका केली. लाडका कॉन्ट्रक्टर ही योजना सरकारने आणली आहे. उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले जाणून घेऊ या पाच मुद्यांमधून...

उद्धव ठाकरे अदानींचा गाडा रोखणार? पत्रकार परिषदेतील पाच मुद्दे
Follow us on

शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा धारावीचा मुद्दा हातात घेतला. धारावी प्रश्नावरुन त्यांनी गौतम अदानी यांना घेरले. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे. ते घरही धारावीतच मिळाले पाहिजे. प्रत्येकाला ५०० फुटांचे घर त्याच ठिकाणी मिळाले नाही, तर अदानी यांचा प्रकल्प मुंबईत होऊ देणार नाही, असा सज्जड दम उद्धव ठाकरे यांनी भरला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी आता धारावी आणि अदानी हा मुद्दा शिवसेना उबाठाकडून उचलला जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारवर शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे जोरदार टीका केली.  त्यांनी लाडकी बहीण योजनावर उपाहासात्मक टीका केली. आता ‘लाडका कॉन्ट्रक्टर’ ही योजना सरकारने आणली आहे. उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले जाणून घेऊ या पाच मुद्यांमधून…

  1. मुंबईला अदानी सिटी करण्याचा मोदी-शाहांचा डाव आहे. परंतु हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. मोदी शहा यांनी मोदींची गिफ्ट सिटी पळवून नेली आहे. ते उद्या मुंबईचे नाव गिफ्ट सिटू करु शकतात. मोदी-शाह यांनी मुंबईचा इतिहास विसरु नये.
  2. बेसुमार टेडीआर काढून अदानी यांना देण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. मुंबईतील सर्व टीडीआर आम्ही अदानी यांना घेऊ देणार नाही. ते फक्त त्यांच्या उद्या ते मुंबईचं नाव बदलून अदानी सिटी असेही करतील.
  3. मुंबईची तिजोरी खाली करण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे टेंडरमध्ये नसलेल्या गोष्टी ते अदानी यांना देऊ करत आहे. टेंडरमध्ये उल्लेख नसलेला टीडीआर ते देत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या विविध घोषणा आहे.
  4. धारावी ५९० एकरची आहे. पात्र, अपात्रच्या निकष लावून धारावी रिकामी कारायची आहे. मुंबईतील नागरी संतुलन बिघडण्याचा हा डाव आहे. काही जणांच्या मानसिकतेला बुरशी आली आहे.
  5. कुर्लाची मदर डेअर, दहिसरचा टोल नका, मुंबईतील मिठाग्रहासह २० जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक ठिकाणी माहिती उपलब्ध नाही, असे दिले जात आहे. मुंबईतील इतर प्रकल्पांना हात का लावत आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.