मुंबई : कोव्हिड – 19 चा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. ते आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या लहान मुलांसाठीच्या कोव्हिड काळजी केंद्राचे लोकार्पण करतांना बोलत होते. (Uddhav Thackeray inaugurated a well-equipped Childrens COVID Center in Mumbai)
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी पडून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करू नये, कोव्हिड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.
आज लोकार्पण होत असलेल्या कोव्हिड काळजी केंद्राविषयी समाधान व्यक्त करून ते म्हणाले की, तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संर्गाचा धोका जास्त असल्याने राज्य शासनाने लहान मुलांसाठी कोव्हिड टास्क फोर्स स्थापन केला असून असा टास्क फोर्स स्थापन करणारे आपले पहिले राज्य आहे. मुंबईत आधुनिक अशी जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून आपल्याला संसर्गाविषयी शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित आणि त्वरेने माहिती मिळत राहील.
कलिना विद्यापीठ आय.टी. पार्क येथे उभारण्यात आलेले लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र हे पाच हजार चौरस फूटांचे असून रुग्ण खाटांची संख्या 30 आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्रशस्त जागा आहे. हे केंद्र कोरोनाग्रस्त लहान मुलांना अलगीकरण व त्यांच्या उपचाराकरिता तयार करण्यात आले आहे. याठिकाणी स्तनदा मातांना स्तनपानाकरिता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
कोरोनाग्रस्त मुलांसोबत पालकांनाही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये ऑक्सिजनयुक्त अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. या कोरोना काळजी केंद्रात 24 तास स्वच्छता व सुरक्षितेसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुलांवर महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील व खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत.
या ठिकाणी लहान मुलांना पोषक आहार देण्यात येणार आहे. मुलांसाठी मनोरंजन उपक्रम उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या केंद्रात लहान मुलाना दवाखान्यात आल्यासारखे वाटू नये व आनंददायी वातावरण असावे, असा प्रयत्न करण्यात आला आहे. रंगीबेरंगी भिंती, वेगवेगळी खेळणी, कार्डबोर्डचे बेड्स, आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईत सर्व सुविधांनी युक्त बाल कोविड सेंटरचे उद्घाटन केले.
CM Uddhav Balasaheb Thackeray inaugurated a well-equipped Children’s COVID Center in Mumbai today. pic.twitter.com/Mf5utX9P8v
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 21, 2021
इतर बातम्या
राज ठाकरे म्हणतात, राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीवाद फोफावला; प्रविण दरेकरांनी दोनच शब्दात दिलं उत्तर
उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधींना काय सांगितलं?; राऊतांनी केला गौप्यस्फोट!
(Uddhav Thackeray inaugurated a well-equipped Childrens COVID Center in Mumbai)