उद्धव ठाकरे यांची कल्याण काबीज करण्याची तयारी, पण एकनाथ शिंदे यांनी दिला जोरदार धक्का

| Updated on: Mar 17, 2024 | 9:53 AM

ShivSena Eknath Shinde: कल्याण लोकसभा मतदार संघावर शिंदे गटाचे वर्चस्व होते. परंतु आता उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोराडे शिंदे गटात आले. यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिकच भक्कम झाली आहे.

उद्धव ठाकरे यांची कल्याण काबीज करण्याची तयारी, पण एकनाथ शिंदे यांनी दिला जोरदार धक्का
द्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोराडे शिंदे गटात
Follow us on

सुनील जाधव, ठाणे | 17 मार्च 2024 : शिवसेना नेते उद्धव ठाकरे धक्क्यातून सावरत नाही. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून एक एक नेते त्यांची साथ सोडून जात आहे. उद्धव ठाकरे संघटनेची बांधणी करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना धक्के बसत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत कल्याणमध्ये गेले. परंतु एकनाथ शिंदे यांच्या एका खेळीने उद्धव ठाकरे यांचा डाव उधळला गेला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

कल्याणमधून उद्धव ठाकरे यांना धक्का

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कल्याण येथील पदाधिकाऱ्याने शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोराडे यांनी शनिवारी सायंकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर बोराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

हे सुद्धा वाचा

यावेळी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे तसेच कल्याण डोंबिवली उल्हासनगरमधील पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

शिंदे यांची परिस्थिती भक्काम

कल्याण लोकसभा मतदार संघावर शिंदे गटाचे वर्चस्व होते. परंतु आता उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोराडे शिंदे गटात आले. यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिकच भक्कम झाली आहे. यामुळे श्रीकांत शिंदे यांना लोकसभेचा गड गाठणे अधिक सोपे झाले आहे तर उद्धव ठाकरे यांची परिस्थिती बिकट होणार आहे. त्यांना निवडणुकीपूर्वी पुन्हा नव्याने जिल्हा प्रमुखाची नियुक्ती करावी लागणार आहे.

हे ही वाचा

उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांना बाजूला करत बनवले आमदार, आता शिंदे गटात जाणार