शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 19, 2022 | 12:54 PM

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विनम्र अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे.

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंज्ञी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवाजी महाराजांना अभिवादन
Follow us on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विनम्र अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे. त्यांनी राज्यातील जनतेला शिवजन्मोत्सवाच्या (Shivaji Maharaj Jayanti) शुभेच्छाही दिल्या आहेत. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. स्वराज्यावर अनेक संकटे आली, काही स्वकीयांकडून तर काही परकीयांकडून, पण महाराज कधीही झुकले नाहीत. त्यांचे शौर्य, व्यक्तिमत्व, रयतेच्या हितासाठी केलेले कार्य, दूरदृष्टी याचे दाखले आजही दिले जातात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आज्ञापत्रातून शिवाजी महाराज प्रजादक्ष होते हे कळतं

महाराजांचे वेगळेपण हे की, ते युगपुरुष होते , त्यांची दूरदृष्टी, आदर्श राज्यकारभार, रणनीती याचे आज आपल्यासमोर उदाहरण आहे. त्यांचे आज्ञापत्र वाचले तर शिवराय किती प्रजा दक्ष होते याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, समयसूचकता ही वैशिष्ट्ये आजच्या व्यवस्थापनशास्त्रालाही अभ्यासण्यासारखी आहेत. शिवराय सर्वांचे होते. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी बांधलेल्या सेनेत अठरा पगड जातीचे लोक होते, जात-धर्म-भाषा यांच्या भिंती ओलांडून शिवरायांवर प्रेम करणारे लोक होते. शिवरायांच्या युद्ध नितीमुळे भारतीय लष्कर त्यांना आज आपले दैवत मानते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करून आपण हा पराक्रमी इतिहास पुढील अनेक पिढ्यांच्या मार्गदर्शनासाठी जतन करण्याचे कामही हाती घेतले आहे. शिवछत्रपतींची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन आमचे सरकार काम करीत आहे आणि पुढे देखील करणार आहे,अशी ग्वाही यानिमित्ताने देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राऊत यांच्याकडूनही शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाची आठवण

आज छत्रपती शिवाजी महाराज आज जयंती असून त्यांना वंदन करतो दिल्लीतलं तख्त राखलेल्या शिवरायांची आज जयंती आहे. महाराष्ट्र त्यांच्याकडून स्वाभिमान शिकलाय, मरण पत्करिन पण शरण जाणार नाही, हा बाणा त्यांनी जपला. दिल्लीने कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्र झुकला नाही लढत राहिला. त्या काळात महाराष्ट्रातले फितूर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते, दिल्लीनेही असेच इथले लोक फितूर केले, इथले फितूर तिथे गेले, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या :

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 LIVE : शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी : राज ठाकरे

Maharashtra News Live Update : आताचे शिवसेना पक्षप्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आलेत : नारायण राणे