CM Uddhav Thackeray live : बाबरी पाडताना फडणवीस सहलीला गेले होते? हे चढले असते तर वजनाने बाबरी पडली असती-मुख्यमंत्री

| Updated on: May 14, 2022 | 10:27 PM

Uddhav Thackeray Speech Live Updates : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हिंदूत्व, हनुमान चालीसा, नवनीत राणा (Navneet Rana), राज ठाकरे (Raj Thackeray), मशीदीवरील भोगे, भाजपकडून वारंवार होणारी टीका हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर आहे. आजच्या या हायव्होल्टेज हुंकार सभेने शिवेसनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरूवात होत आहे.

CM Uddhav Thackeray live : बाबरी पाडताना फडणवीस सहलीला गेले होते? हे चढले असते तर वजनाने बाबरी पडली असती-मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांची वादळी सभा Live
Image Credit source: tv9
Follow us on

Uddhav Thackeray rally live updates : मुंबई : आज मुख्यमंत्र्यांच्या (Cm Uddhav Thackeray Rally Live) हायव्होल्टेज सभेने राज्यातलं राजकारण तापलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हिंदूत्व, हनुमान चालीसा, नवनीत राणा (Navneet Rana), राज ठाकरे (Raj Thackeray), मशीदीवरील भोगे, भाजपकडून वारंवार होणारी टीका हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर आहे. आजच्या या हायव्होल्टेज हुंकार सभेने शिवेसनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरूवात होत आहे. या सभेची गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील जनतेला आणि शिवसैनिकांना प्रतीक्षा होती. केंद्र सरकारकडून सुडभावनेतून राज्यातल्या नेत्यांवर कारवाई होत आहेत, असाही आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तर या सभेआधी भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना काही खोचक सवालही विचारले होते. अर्थातच हेही मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर असणार आहे. या सभेसाठी बीकेसीतील मैदान हे खचाखच भरलं आहे. देशभर या सभेचा गाजावाजा आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 May 2022 09:07 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    गेल्या पाच वर्षात देशात दोन कोटी जनतेचा रोजगार गेला

    या बातमीकडे कोण लक्ष देतंय

    आज कुठेतरी आपण एका मार्गावर चाललो आहे

    लोकांची माथी भडकवू नका

    हातात धोंडे दिले तर तेच उद्या तुम्हाला मारतील

  • 14 May 2022 09:05 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    प्रार्थना नुसत्या पाठ करून चालणार नाही

    त्याचा अर्थ समजला पाहिजे

    मातोश्रीवर यायाचा प्रयत्न केला नंतर पळून गेले

    नवनीत राणा आणि रवी राणा यांचाही मुख्यमंत्र्यांकडून समचार

     

  • 14 May 2022 09:03 PM (IST)

    केतकी चितळेचा ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ने घेतला ताबा

    केतकी चितळेचा ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ने घेतला ताबा

    ठाण्यातील गुन्हे शाखा युनिट 1 कार्यालयात आणले

    सोबत ठाणे पोलिस, ठाणे खंडणी पथक,दंगल नियंत्रण पथक,मालमत्ता कक्ष ,गुन्हे शाखा युनिट 3 ,4 आणि 5 तसेच ठाणे नगर पोलीस असा पोलिस बंदोबस्त

  • 14 May 2022 09:01 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    जावेद मियादादला बाळासाहेबांनी तोंडवर सांगितलं की हल्ले थांबल्याशिवाय क्रिकेट होणार नाही

    जावेद एकाग्रता भंग करण्यासाठी माकडचाळे करायाचा

    अशा बोबड्यांकडे लक्ष देऊ नका

    हे सरकारचं लक्ष करण्यासाठी हे सर्व करत आहेत

    उद्धव ठाकरेंना प्रशासन कळत नाही, तर सरकार कसं चालणार हे यांना वाटतं

    पिकलेले आंबे पडत आहेत पण यांना सरकार पडेना

    मग आच्या मगे ईडी, सीबीआय लावल्यास आम्ही गप्प बसणार नाही

    लढायचं असेल तर सरळ या तेव्हा जनता ठरवेल राज्य कोण करणार

    श्रीलंकेत काय चाललंय ते बघा

  • 14 May 2022 08:57 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    आमच्या दौऱ्याचे आम्हाला भाडंवल करायची गरज नाही

    या मंदिरावर भोंगा आणि झेंडा लावायला पुढे जाल पण मंदिरं टिकवण्यासाठी आम्ही झटतोय

    पुरातत्व खाती ज्यांना तत्व नाही अशी खाती गाढा

    हे थडग्यांची देखरेख करताहेत मात्र मंदिराची नाही

    कांजूरमधील जागेसाठी फडणवीसांनी जाऊन बोंबलाव

    विकास कामांसाठी केंद्राकडे जाऊन बोंबलावं

    हे दैवत जन्माला आलं नसतं तर तुम्हीही भोंग्यात असता

    छत्रपतींच्या मराठी भाषेसाठी जाऊन बोलाना

  • 14 May 2022 08:56 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    संजय दत्तला गांधी दिसतात तसे राज ठाकरेंना बाळासाहेब झाल्यासरखं वाटतं

    त्यातला मुन्नाभाई लोकांचं भलं तर करायचा

    मात्र शेवटी संजय दत्तला कळतं की आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला

    तसे मुन्नाभाई फिरत राहुद्या

    आदित्य आता अयोध्येला जात आहेत

  • 14 May 2022 08:51 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    राज्य स्टार्टपमध्ये एक नंबरला आहे

    गुतवणुकीतही महाराष्ट्र पुढे चालला आहे

    हे यांना पाहवत नाही,  म्हणून हे कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत

    सुरक्षा सोमय्यांना तुम्ही दिली तर हल्ला कुणी केला आम्हाला काय विचारता

    जे तुम्ही आरोप केले ते तुम्ही बाहेर काढा

    आम्ही नामर्दाची औलाद नाही, आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही

    आणि कुणी अंगावर आला तर सोडतही नाही

    याच्या सत्तेवर एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र विद्रूप करण्याचं काम सुरू आहे

    सरकारपेक्षा जास्त मजबूत इकडे शिवसैनिकांचे मावळे बसले आहेत

  • 14 May 2022 08:48 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    महापालिकेच्या शाळेत जायला लोक लाजत होते

    मात्र आता शाळेत प्रवेश घ्यायला रांग लागतो

    तुमचं राज्य आहे केजरीवाल आमची महापालिका तुम्हाला टक्कर देतेय

    आता दाऊच्या मागे लागलेत, मात्र दाऊद भाजपात गेला तर त्याला मंत्री बनवतील

    आणि उद्या सांगतील दाऊद आमचा गुणाचा पुतळा आहे

    बाबरी पाडल्यावर तुम्ही शेपट्या आत घालून बसला होता

    तेव्हा तुमची विथभर नाही तर मैलभर पळापळ झाली होती

    आम्ही भरलेली थाळी दिली, तुम्ही  रिकामी थाळी वाजवायला सांगता

  • 14 May 2022 08:46 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    देश कुणाच्या हातात द्यायचा

    एका बाईने शरद पवारांवर कमेंट केली

    तुमच्यावर काही संस्कार होतात की नाही

    तुझ्या मुलांचं काय होणार, तुझ्या भविष्याचे काय होणार

    देवेंद्र फडणवीस बाबरीवर चढले असते तरी बाबरी पडली असती

    फडणवीस काहीही बोलतात

    बाबरी पाडली तेव्हा काय सहलीला गेले होते का

  • 14 May 2022 08:41 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    निवडणुका शांततेत पार पडल्यावर दहतवाद्यांचे आभार मानले

    फडणवीस बाबरी पाडताना शाळेच्या सहलीला गेले होते का

    तुमचं वय किती होतं बोलता किती

    फडणवीसांनी बाबरीवर चढायचा प्रयत्न केला असाता तर बाबरी पडली असती

  • 14 May 2022 08:37 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    आम्ही काँग्रेससोबत गेलो तर आम्ही हिंदूत्व सोडलं नाही

    सत्ता असली नसली तरी फरक पडत नाही पण हिदूत्व नाही सुटणार

    काँग्रेससोबत गेलो तर उघड गेलो, तुमच्यासारखा पाहटे शपथविधी घेतला नाही

    तुम्ही एनडीएमध्ये किती पक्ष जमवले होते

    काय काय लोकांचा एकही खासदार नसताना एनडीएत होते

    नितीश कुमार यांच्यासमोर हिंमत आहे का तुमची

    काश्मिरात चाललेलं तेव्हाही सुरू होतं

    मेहबुबा मुफ्ती तुमच्या कानात वंदे मातरम बोलतात का

  • 14 May 2022 08:34 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    सरकारी कार्यालयात घुसून राहुल भट्टला गोळ्या घातल्या

    तिथे हनुमान चालीसा म्हणायची का

    ते मारून जायच्या आत अतिरिकेक्यांचा खात्मा केला जातोय

    आता काश्मिरी पंडितांसोबत जे सुरू आहेत ते काश्मिर फाईल्सचं पुढचं पान आहे का

    महागाई वाढली, लाज नाही, लज्जा नाही, कर्तृत्व नाही, हे तुमचं हिदूत्व आहे

    संभाजीनगरमध्ये ओवैसी गेला औरंगजेबाच्या थडग्यावर गेला

    हे भाजपकडून सुरू आहे

    कुणाला भोंगा द्यायचा, कुणाला थडग्यावर पाठवायंच

    मग हे आहेत रिकामे तोंडाला टॉमॅटो सॉस लावून बसतात

    आणि यांना वायप्लस झेड प्लस सुरक्षा देत आहे

    ही भोकं पडलेली तीनपाटांना का सुरक्षा देताय

    आमच्या हिंदुत्वाचे मोजमाप घेणारे तुम्ही कोण?

  • 14 May 2022 08:31 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    सामनात येणारं देशाच्या आणि राज्याच्या हिताचं असतं

    आम्ही भाजपच्या भाषेत मोदींचा अपमान कधी केला नाही

    तुमचे संस्कार सोडल्यावर तुमचं हिंदुत्व राहतं कुठे?

    संवेदनशील भाजप आता कुठे गेला

    आता जबाबदारी कुणावर आहे

  • 14 May 2022 08:27 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    दुसरा महाईचा मुद्दा मोठी अडचण झालीय

    महागाईवर कोणीच बोलत नाही

    पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यास सांगितलं

    मात्र आमचं देणं तुम्ही वेळेवर देत नाही

    तुम्हाला मुंबई फक्त ओरबडण्यासाठी हवी आहे

    सर्वात आधी मुंबईसाठी शिवसैनिक धावतो

  • 14 May 2022 08:25 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    एकादही संघ स्वातंत्र्य लढ्यात उतरला नाही (आरएसएस)

    तुमचा आणि स्वातंत्र्यांचा संबंध काय

    संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यात तुम्ही नव्हता

    माझे अजोबा पहिल्या पाच सेनापती मध्ये एक होते

    संयुक्त महाराष्ट्र समितीतून पहिले जनसंघ फुटला

    म्हणजे भाजपचा बापच फुटला

    तेव्हापासून मुंबईचा लचका तोडण्याचा यांचा डाव लक्षात घ्या

  • 14 May 2022 08:24 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    फडणवीसांच्या मालकांची इच्छा मुंबई स्वतंत्र करण्याची

    पण शंभर पिड्या जरी आल्या तरी हे होणार नाही

    ही मिळवलेली मुंबईलेली आहे.

    मुंबईचा लचटा तोडल्यास तुकडे तुकडे करून टाकू

    सभा होतेय त्या जागेवर ते बुलेड ट्रेन आणत आहेत

    कुणाला हवी आहे बुलेट ट्रेन

    बुलेट ट्रेन आणून मुंबई तोडण्याचा डावा

  • 14 May 2022 08:22 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    आमच्या जुन्या फोटोमुळे भाजपचा गैरसमज झाला असेल

    आमच्यासोबत गाढवं होती

    त्यांनी लाथ मारायच्या आधी आम्हीच लाथ मारली

    एक भ्रम निर्माण केला जातोय की हिंदुत्वाचे रक्षक कोण आहेत

    हे बसलेले शिवसैनिक हिंदुत्वाचे खरे रक्षक आहेत

  • 14 May 2022 08:17 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : संजय राऊत Live

    आज छत्रपती संभाजीराजेंची जयंती आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे त्या छत्रपती संभाजीराजेंसारखं आहे. प्राण जाये पर वचन ना जाये. प्राण जाईल पण हिंदुत्वाचा पराभव होऊ देणार नाही.

    काल औरंगाबादेत तो ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाला हा महाराष्ट्राचा अवमान आहे. मी सांगू इच्छितो, 2014 पासून ओवैसी औरंगाबादेत येत आहे. फडणवीसांच्या काळात आतापर्यंत 20 वेळा तो औरंगजेबाच्या कबरीवर गेला. तुमच्यात हिंमत होती तर त्याला का रोखलं नाही. आम्ही महाराष्ट्रानेच त्या औरंगजेबाला गाडलं. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झालाय.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भोगलं ते आपण आज भोगतो आहोत. तिच लढाई आपण आज औरंगजेबाशी शाहिस्तेखानाशी लढतो आहोत. आज काश्मिरमध्ये काय सुरु आहे. गेल्या तीन महिन्यात तिथे 27 काश्मिरी पंडितांची हत्या झाली. या गोष्टी तुमच्यासमोर येत नाहीत. काल राहुल भट या सरकारी कर्मचाऱ्याच्या कार्यालयात अतिरेकी घुसले. दिवसाढवळ्या गोळ्या घालून अतिरेकी निघून गेले. त्याविरोधात काश्मिरी पंडितांनी आंदोलन केलं त्यांच्यावर केंद्र सरकार अश्रूधुराच्या नळकांड्या फोडतं. काश्मीरमध्ये आज पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजतेय. शिवसेनेकडे बोटं दाखवू नका नाहीतर तुमचीच बोटं छाटली जातील.

  • 14 May 2022 08:16 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्र्यांची स्टेजवर धडाक्यात एन्ट्री

  • 14 May 2022 08:05 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : आदित्य ठाकरेंचं भाषण Live

    महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री राज्यभर जात होते. तिथल्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केली. कोविड काळात जे काम महाराष्ट्रानं केलं त्याचं कौतुक मुंबई, महाराष्ट्र किंवा देशानं नाही तर जगानं केलं त्याचा अभिमान आपल्याला असायला हवा.

    2020 चा काळात ८ मार्च रोजी अजित पवार यांनी बजेट सादर केलं. शेतकरी कर्जमाफीनंतरचं हे बजेट होतं. त्यानंतर कोविड काळात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि 15 दिवसात हॉस्पिटल उभं करण्याचे आदेश दिले. आपला लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं होता. केंद्रानं अचानकपणे लॉकडाऊन जाहीर केला.

    मुख्यमंत्री लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन येऊन लोकांना मार्गदर्शन करायचे तेव्हा लोकांना वाटायचं हा कुणी मुख्यमंत्री नाही तर आपल्या कुटुंबातील व्यक्ती बोलतोय. असा मुख्यमंत्री असायला हवा. आपण कोरोनामुक्तीचा धारावी पॅटर्न दाखवून दिला. देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये आपले मुख्यमंत्री असतात. त्याचा आम्हाला एक शिवसैनिक म्हणून कौतुक आणि अभिमान आहे.

    कोरोना काळातही आपला विकास थांबला नाही. उलट महाविकास आघाडीने शाश्वत विकास दिला. मेट्रोची कामं, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मुंबई नागपूर हायवे अशी अनेक कामं सुरु होती आणि आहेत. अर्थचक्र सुरु ठेवण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर होतं. पण तरीही आपण विकासकामं थांबवली नाहीत.

    बीएमसीची कामं, महाराष्ट्र सरकारची कामं अनेक आहेत. जेव्हा आपल्या राज्यात देशात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महागाई, बेरोजगारी, समाजात, माणसात भांडण लावलं जातं, अनेकांनी वेगवेगळे रंग हातात धरले आहेत. अशावेळी तुम्ही भांडणं लावणाऱ्यांचं सरकार आणणार आहात की चूल पेटवणाऱ्यांचं सरकार आणणार आहात? हे ठरवायला हवं.

  • 14 May 2022 08:03 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : आदित्य ठाकरेंचं भाषण Live

  • 14 May 2022 07:38 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : सभेसाठी मुख्यमंत्र्यांची धडाक्यात एन्ट्री

    मुख्यमंत्री काही वेळात सभास्थळी पोहोचणार

    मुंबईतल्या बीकेसीत भगवं वादळ

  • 14 May 2022 07:36 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : सभेसाठी मुख्यमंत्र्यांची धडाक्यात एन्ट्री

  • 14 May 2022 07:34 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्र्यांची बीकेसीत सभा live

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेसाठी रवाना

    काही वेळातच मुख्यमंत्र्यांचं वादळी भाषण

  • 14 May 2022 07:33 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्र्यांची बीकेसीत सभा live

  • 14 May 2022 07:30 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्र्यांची बीकेसीत सभा live

  • 14 May 2022 07:10 PM (IST)

    CM Uddhav Thackeray live : मुख्यमंत्र्यांची काही वेळात बीकेसीत सभा

    बीकेसीतील मैदानात तुफान गर्दी

  • 14 May 2022 06:57 PM (IST)

    शिवसेनेचे कार्यकर्ता बीकेसी मैदानसाठी रवाना

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा बीकेसी मैदान मधला मास्टर सभेसाठी अंधेरी पश्चिम मधून 50 बस भरून शिवसेनेचे कार्यकर्ता बीकेसी मैदानसाठी रवाना झाले आहेत, विशेष म्हणजे यामध्ये मोठा संख्या मध्ये शिवसेनेचे मुस्लिम कार्यकर्ता आहेत जे मुख्यमंत्री यांचा सभा ऐकण्यासाठी निघाले आहेत,

  • 14 May 2022 06:49 PM (IST)

    उजनी धरणातून इंदापूरला देण्यात येणाऱ्या पाण्याविरोधात उद्यापासून आंदोलन पेटणार

    उजनी धरणातून इंदापूरला देण्यात येणाऱ्या पाण्याविरोधात उद्यापासून आंदोलन पेटणार

    – सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पवारांचे एजंट म्हणून कार्यरत आहेत

    – सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय तसेच सर्व शेतकरी संघटनांचे नेते एकत्र येवून उद्यापासून पंढरपूरमध्ये आंदोलनाला सुरुवात करणार

    – पालकमंत्री म्हणून भरणे यांनी दोन वर्षात एकही योजना आणली नाही मात्र उजनीतील पाण्याचा कोणताही संबंध नाही तिथे दरोडा टाकून त्यांनी 350 कोटी रुपये त्यांनी स्वतःच्या तालुक्यासाठी आणि बारामतीसाठी नेले

    – बारामतीकरांचा दलाल म्हणून, बारामतीकरांचा एजंट म्हणून भरणे यांनी प्रत्येक ठिकाणी दरोडा घालण्याचे काम केले

    – कोव्हिडमधील भ्रष्टाचारासोबतच सोलापूर जिल्ह्यातील एकमेव धरण असलेले पाणीदेखील घेऊन जात आहेत

    – खडकवासला आणि इतर धरणातून आजच्या लाकडी निंबोडी योजनेला पाणी येणे अपेक्षित होते ते आजही उजनीतून दिले जातेय

    – सुप्रिया सुळेंचा पराभव होऊ नये म्हणून हा टाकलेला डाव आहे.

    – सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे दीड वर्षे झाले पालकमंत्री आहेत मात्र त्यांनी आत्तापर्यंत एकदाही चंद्रभागेत पाय ठेवला नाही त्यामुळे त्यांना बुडवण्याचे काम आम्ही उद्या चंद्रभागेत करतोय

  • 14 May 2022 06:35 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत Live

    स्वातंत्र्यांची कवचकुंडलं घेऊन जे हल्ले करताय चे चुकीचं आहे

    केतकी चितळेमागे कोण आहे ते पोलीस शोधतील

    गुन्हा करायची एखाद्याला सवय लागते, त्याला सिरीयल क्रिमिनल बोलतात

     

  • 14 May 2022 06:31 PM (IST)

    कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याच भान पाहिजे: देवेंद्र फडणवीस

    कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याच भान पाहिजे

    सोशल मीडियावर तर अतिशय खालचे शब्द वापरले जातात अशी भाषा कुणीही वापरू नये

    भाजप च्या मीडिया सेल कडून पवारांच्या व्हिडीओ मोडतोड झालेली नाही

  • 14 May 2022 06:26 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी ठाण्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक दाखल

    आज उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी ठाण्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक दाखल

    ठाण्यातील वागळे भागतील शिवसैनिक यांनी ढोलताशा वाजवत, शंख नाद करत सभेच्या ठिकाणी

    शिवसैनिकांतून निघाला एक वेगळा जोश यावेळी शिवसैनिक यांच्यात दिसला

    आज अनेकांना त्यांची उत्तरे मिळणार असे यावेळी शिवसैनिकांनी सांगितले..

  • 14 May 2022 06:11 PM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live

    कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबाबत आपण काय बोलतो याचं भान असलं पाहिजे

    असे शब्द वापरू नये

    भारतीय जनता पक्षाच्या ट्विटरवर कोणतीही काठछाट केली नाही

    पाहिजे असेल तर चॅनलचे नाव सांगतो

    ओवैसींचे वर्तन खपवून घेतलं जााणार नाही

    औरंगजेब नावाच्या हरामखोर सुल्तानाच्या कबरीवर कोणी जाईल तर हा मुस्लिमांचाही अपमान आहे

  • 14 May 2022 05:59 PM (IST)

    शिवसेना सभेसाठी भिवंडीतील  शिवसैनिक शेकडोंच्या संख्येने रवाना

    साईबाबा नाका येथे एकत्रित होत सायंकाळी 5 वाजता मुंबईच्या दिशेने गेले

  • 14 May 2022 05:51 PM (IST)

    Uddhav Thackeray Rally Live : सध्या मुख्यमंत्री मोतोश्रीवर गेले

  • 14 May 2022 05:50 PM (IST)

    संजय राऊत सामनातून सभेसाठी निघाले

    काही वेळात मुख्यमंत्री सभेसाठी रवाना होणार