मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण!

| Updated on: Jan 25, 2021 | 11:06 AM

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. (uddhav thackeray should not attend farmers march says sharad pawar)

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं हे कारण!
शरद पवार, उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येण्याची चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये असं शरद पवार यांचं मत असल्याचं समजतं. त्यामुळे मुख्यमंत्री शेतकरी आंदोलनात येतील की नाही? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (uddhav thackeray should not attend farmers march says sharad pawar)

मुख्यमंत्रीपद हे घटनात्मकपद आहे. त्यामुळे त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये, असं शरद पवार यांना वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवाय मुंबईत कोरोनाचं संकटही आहे. त्यामुळेही मुख्यमंत्र्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असंही पवारांचं मत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कृषी कायदे पास केले आहेत. कोणताही कायदा मंजूर करताना त्यावर चर्चा करायची असते. पण चर्चा न करताच केंद्र सरकारने हा कायदा मंजूर केला आहे. शेतकऱ्यांची बाजू जाणून घेण्याची गरज होती. केंद्राने ते केलं नाही. त्यामुळे एवढं वादंग माजलं आहे, असंही पवारांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आदित्य ठाकरे येणार

दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आझाद मैदानातील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरेंना पाठवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे मोर्चात येणार असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. (uddhav thackeray should not attend farmers march says sharad pawar)

 

संबंधित बातम्या:

धनंजय मुंडेंच्या ‘परस्पर संबंधा’वर पंकजांनी मौन सोडलं, म्हणाल्या..

लवकरच कुठूनही मतदान करण्याचा हक्क मिळणार? कसा? चाचपणी सुरु

Farmer Protest : मुंबईत ‘लाल वादळ’ घोंघावणार!, कसा असेल पोलीस बंदोबस्त?

(uddhav thackeray should not attend farmers march says sharad pawar)