“सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडत आहे. आतापर्यंत केलेला कारभार जनता विसरुन, फसव्या योजनांना बळी पडेल अशी अपेक्षा आहे. बाकीच्या योजनांबद्दल आज मी काही बोलणार नाही. त्याच्याबद्दल जनता बोलतेय, अनुभव घेत आहे. मला वाटेल तेव्हा मी, आदित्य आवाज उठवू. आज मी लाडका मित्र, लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका उद्योगपती योजनेबद्दल बोलणार आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. धारावी पुनर्वसन प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. “धारावीकरांना जिथल्या तिथे 500 चौरस फुटाच हक्काच घर मिळालं पाहिजे. ही शिवसेनची आग्रही भूमिका आहे” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. “धारावी एक झोपटपडड्टी नाही. वेगळं इंडस्ट्रीयल स्लम आहे. तिथे प्रत्येक घरात मायक्रोस्केलचे उद्योग चालतात. त्या काही कुंभार, इडलीवाले, चामड्याचे उद्योग करणारे आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत. त्या उद्येगाच काय करणार? हा प्रश्न आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“बेसुमार टीडीआर काढून अदानींना देण्याचा डाव आम्ही उधळून लावणार. कधीही आम्ही हे यशस्वी होऊ देणार नाही. मुंबईकरांनी अदानींकडून टीडीआर विकत घेतला पाहिजे, याविरोधातही आम्ही दंड थोपटले आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “योजनांच्या फसव्या, धुरळ्यामागे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राच कसं ते भल करु इच्छित आहेत, ते आम्ही दाखवतोय. मोदी-शाह यांचा मुंबईला अदानी सिटी करण्याच डाव आहे. पण ते आम्ही कदापी होऊ देणार नाही. मुंबईत मराठी माणूस एकवटला की, तो असे प्रकार उधळून लावतो. मुंबई वाचवतो” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘धारावीकरांना पात्र-अपात्रेत अडकवून हाकलून द्यायचा डाव’
“मुंबईला लुटायचं, मुंबईची तिजोरी रिकामी करायची, मुंबईला भिखेला लावायच, हे आम्ही कदापी होऊ देणार नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “अदानीने टेंडर दिलं त्यावेळी त्यात नसलेल्या गोष्टी ते आज देऊ करतायत. धारावीचा भूखंड 590 एकरचा आहे. त्यात 300 एकरवर गृहनिर्माण आहे. उर्वरित भूखंडाच्या जागेवर माहिम नेचर पार्क आणि टाटा पावर स्टेशन आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “धारावीत आता प्रत्येक घराला नंबर दिला जातोय. धारावीकरांना पात्र-अपात्रेत अडकवून हाकलून द्यायचा डाव आहे. हे आम्ही होऊ देणार नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले. धारावी रिकामी करायची. अलगदपणे अदानींच्या खिशात घालायची. मग भूखंडाच श्रीखंड ओरपण्याचा हा प्रकार आहे. मुंबईच नागरी संतुलन बिघडवण्याचा हा डाव आहे” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
‘540 एकर जागा मागितली’
त्यांनी 590 एकरच्या वर 540 एकर जागा मागितली आहे. अधिकची जागा मागताना पात्र-अपात्रतेचे नंबर ऐवढे वाढवायचे की, प्रकल्प होऊ शकत नाही, असं दाखवायच. अधिकच्या जागेसाठी दहीसरची मदर डेअरी, मुंबईतील मिठागर, मुलुंड टोलनाका इथल्या जागेवर लक्ष आहे. लाडक्या मित्रासाठी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहीत करतात हा काय प्रकार आहे” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.