आदित्य ठाकरे यांच्या अटकेबाबत मोठा दावा काय?, ठाकरे कुटुंब डेहराडूनला; कुणाचं ट्विट व्हायरलं

| Updated on: Nov 03, 2023 | 12:00 PM

वरळी सीफेसला एक बॅरेकेटिंग असलेला रस्ता आहे. त्यावेळी फक्त ठाकरे गटासाठी हे बॅरेकेटिंग खुले व्हायचे. ते त्यांना दिसलं नाही. आता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर बोलत आहेत, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील घरासमोरचा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले होतेय

आदित्य ठाकरे यांच्या अटकेबाबत मोठा दावा काय?, ठाकरे कुटुंब डेहराडूनला; कुणाचं ट्विट व्हायरलं
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय डेहराडूनला गेल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगडला गेले म्हणून त्यांच्यावर टीका करणारे उद्धव ठाकरे हे डेहराडूनला कसे जातात? असा सवाल करतानाच आदित्य ठाकरे यांना अटक होणार आहे, असा मोठा दावाही नितेश राणे यांनी केला आहे. राणे यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरे यांना खरंच अटक होणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे हे कुटुंबासह डेहराडूनला गेल्याचं म्हटलं आहे. ठाकरे कुटुंब खानसामासह काल दुपारी 1 वाजता डेहराडूनला रवाना झालं आहे. हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी?जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही का?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

ती कौटुंबीक सहल नव्हती

देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगडमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. फडणवीस पक्षासाठी गेले होते. कौटुंबिक सहलीसाठी नाही. तुम्ही फक्त कौटुंबीक सहलीसाठी गेला आहात, असा हल्ला नितेश राणे यांनी चढवला आहे.

आदित्य ठाकरेंना अटक होणार?

दरम्यान, आदित्य ठाकरे यांना काही दिवसात अटक होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांचं नवा न घेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ही अटक होणार असल्याचं नितेश यांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून दसरा मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे देश सोडून जाणार आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.

काय आहे ट्विट?

मला आशा आहे की सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा खटला लवकरच सुरू होणार आहे. ही ट्रायल सुरू असताना अटक टाळण्यासाठी बेबी पेंग्विन देशातून गायब तर होणार नाही, असं सूचक ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना अटक होणार का? ते देश सोडून जातील का? अशी चर्चा रंगली आहे.

 

फोन टॅप केले जायचे

नितेश राणे यांनी कालच फोन टॅपिंगवरून ठाकरे गटावर हल्ला चढवला होता. मागच्या सरकारच्या काळात मातोश्रीवर हॅकर्स बसवले होते. त्यांनी आमचे फोन टॅप केले. मातोश्रीच्या कोणत्या मजल्यावरून फोन टॅपिंग व्हायचं हे आम्हाला माहीत आहे. त्यावर संजय राऊत यांनी बोलावं. आमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही टॅपिंग असायची. संदीप देशपांडे असतील किंवा मविआचे विरोधक… असे बॅरेच नेते आहेत त्यांचं टॅप केले जायचे, असा दावाही त्यांनी केला आहे.