उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, उद्या बंद ऐवजी हा पर्याय, स्वत: उतरणार रस्त्यावर

| Updated on: Aug 23, 2024 | 7:23 PM

uddhav thackeray: हाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून निषेध करणार आहे. मी शिवसेना भवनासमोरील चौकात उद्या बसणार आहे. सकाळी 11 वाजता तोंडाला काळ्या फिती लावून बसणार आहे. त्याला कोणी मनाई करु शकत नाही.

उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, उद्या बंद ऐवजी हा पर्याय, स्वत: उतरणार रस्त्यावर
uddhav thackeray
Follow us on

उच्च न्यायालयाने उद्या होणारा बंद बेकायदेशीर ठरवला आहे. त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बंद मागे घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला. आता शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ते आता स्वत: रस्त्यावर उतरणार आहे. बंद नसला तरी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात काळ्या फिती लावून निषेध करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्या महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून निषेध करणार आहे. मी शिवसेना भवनासमोरील चौकात उद्या बसणार आहे. सकाळी 11 वाजता तोंडाला काळ्या फिती लावून बसणार आहे. त्याला कोणी मनाई करु शकत नाही. त्याला मनाई केली तर जनतेचे न्यायालय आहे. भावना व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे

कायदा ज्यांच्या हातात असतो ते बेजबाबदारपणे वागत असतील त्याचा उल्लेख कोर्टाने केला आहे. कोर्टानेच काल सरकारला विचारले होते. भावना व्यक्त करण्याचा अधिकार लोकांना आहे की नाही. बंद म्हणजे आम्ही दगडफेक करा, हिंसाचार करा, असे म्हटले नव्हते.  सर्वांना आपल्या कुटुंबाची काळजी आहे. बहीण, आईची काळजी आहे. तिचे रक्षण करणार कोण आहे, हे सर्वांच्या मनात आहे. यामुळे बंद करायचा प्रयत्न केला. बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर तोंडच बंद करणार आहोत. मी स्वत शिवसेना भवनातील चौकात जाऊन बसणार आहे. तोंडाला काळीफीत लावणार आहे. मला वाटतं तिथे मला कोणी रोखू शकणार नाही.

हे सुद्धा वाचा

दोन तास आंदोलन करणार

मी दोन तास आंदोलन करणार आहे. तोंडाला काळी पट्टी बांधून शिवसेना भवनाजवळ बसणार आहे. माझे रक्षण करण्यासाठी कोणी येत नाही असे लोकांना वाटते, तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. बांगलादेशात ते सर्वांन पाहिले आहे. ते आपल्या देशात होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत. आमचे आंदोलन थांबणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहणार आहे.

सरकार नराधमांना पाठीशी घालवत आहे. उत्स्फूर्तपणे आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे. ते स्वतच्या विश्वात मश्गुल आहेत. त्यामुळेच आम्ही आंदोलन करणार आहोत. लोकांना जागरूक करत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

न्यायालयाने ही तत्परता पुढेही दाखवावी

बदलापूरच्या केसवर आता कोर्ट फास्ट ट्रॅक काय असते ते दाखवेल अशी आशा आहे. काल कोर्टाने जे थोबडवले ते मुख्यमंत्री आणि सरकारला चपराक नाही का? आताही मी कौतुक करत आहे. न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक आहे. न्यायालय हे तत्परतेने हलू शकते. तीच तत्परता त्यांनी ज्या कारणासाठी आंदोलन करणार होतो त्यावर दाखवली पाहिजे. आरोपींना शिक्षा सुनावली पाहिजे.