मतदानाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन उद्धव ठाकरे अडचणीत येताना दिसत आहेत. 20 मे रोजीची मतदान संपण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते. त्यावरुन भाजपच्या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगानं केद्रीय आयोगाला अहवाल दिला आहे. 20 तारखेला मतदान संपण्याच्या ठीक तासाभराआधी केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंवर केंद्रीय निवडणूक आयोग कारवाई करु शकते.
मतदान सुरु असतानाच पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर आरोप केले. त्यामुळं ठाकरेंच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भाजपच्या शेलारांनी केली होती. त्यासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची पाहणी करुन त्यासंदर्भातला अहवाल राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे.
20 मे रोजी मुंबईसह महाराष्ट्रातल्या 13 जागांवर मतदान झालं. पण मुंबईत संथ गतीनं मतदान झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. काही ठिकाणी 3 ते 4 तास मतदानासाठी लागले. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी मतदान संपण्याच्या एक तासाआधीच पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेला होणाऱ्या मतदानाच्या ठिकाणीच, बिलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगावर ही त्यांनी टीका केली.
आता राज्य निवडणूक आयोगानं अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग अशा प्रकारात काय कारवाई करु शकते. या कायदेतज्ज्ञ सांगतात की, अशा प्रकारच्या प्रकरणामुळे निवडणूक आयोग चौकशी करु शकते. आचारसंहितेचा भंग झाला असेल तर त्यात निवडणूक आयोग लक्ष घालू शकते.
राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालावर पुढची कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाला करायची आहे. अर्थात उद्धव ठाकरेंना आपलं म्हणणं मांडण्यासाठी संधीही मिळेल. आता केंद्रीय निवडणूक आयोग काय भूमिका घेतं, हे पाहावं लागेल.