नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार उद्या मुंबईमध्ये येणार आहेत. राज्यात वाढत असेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीर त्या मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती टीव्ही 9 ला सुत्रांकडून मिळाली आहे. दुपारी 12 वाजात सह्याद्री अतिथीगृहामध्ये भारती पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोनाची लाट ओसरत आहे, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोविड 19 ने डोके वर काढले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस राज्यातील ओमिक्रॉनबाधितांच्या संख्यात वाढ होत आहे. या सर्व परिस्थितीवर केंद्राची नजर असून, राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या भारती पवार या मुंबईमध्ये येणार आहेत.
राज्यात आज कोरोना रुग्णांनी 12 हजारांचा आकडा पार केला आहे, आज राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पुन्हा पोहोचले आहे. राज्यात आज ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले आहेत. मुंबई-40, पुणे-14 नागपूर- 4, पुणे ग्रामीण ,पनवेल प्रत्येकी 3 तर कोल्हापूर, नवी मुंबई, सातारा ,रायगड 1 रुग्ण, ही आजची आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 578 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
कोविड लसीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; वर्षा गायकवाड यांनी घेतला आढावा
मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही निर्णय! पहिली ते नववीचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार, 10वी, 12वीचं काय?