मुंबई : शिंदे गट आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिनसलं आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीरपणे एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याचं उघड झालं आहे. भाजप आणि शिंदे गटातील या वादावादीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षङ जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत दोन्ही पक्षावर खोचक टीका केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
आगतिकतेने एकत्र आलेले हे लोक आहेत. सत्ता टिकवण्यासाठी भाजपने शरणागती पत्करून शिंदेंच्या पुढे गुडघे टेकले आहेत. शिंदे साहेबांवर अदृश्य फोर्स आहे. त्यामुळे त्यांना सत्तेत राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद होतच राहतील. कदाचित शिंदे गटाच्या चिन्हावर त्यांचे आमदार उभे राहणार नाहीत. कमळाच्या चिन्हावर उभं राहण्याचा आग्रह करतील. लोकसभेला एक वर्ष आहे. हळूहळू ते कळेलच, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. जयंत पाटील यांनी दुसऱ्यांदा हा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात येणार आहे हे नितीन देशमुख यांना एक महिना आधीच माहीत होतं. तसंच त्यांनी म्हटलं आहे. त्याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता याबाबत एकनाथ शिंदे यांना माहिती असेल. देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल. हे भाजपमध्येच होऊ शकतं असं मला वाटतं, असा टोला जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस यांनी लगावला आहे.
समान नागरी कायदा होणार की नाही माहीत नाही. समान नागरी कायदा म्हणजे नक्की काय यांची माहिती नाही. समान कायदा लागू झाला तर आरक्षण राहणार की जाणार? हे पाहावं लागेल. आम्हाला सर्वांवर अभ्यास करावा लागेल. समान नागरी कायदा धोरण होणार असं भाजप अध्यक्षांनी सांगितलं. पण त्यात काय असेल हे त्यांनी सांगितलं नाही, असंही ते म्हणाले.
समान नागरी कायद्यात काय
यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्यावरही हल्ला चढवला. दीपक केसरकर सध्या कुठल्या पक्षात आहेत? अनेकांचे पत्ते अलिकडे सारखे बदलतात. केसरकर हे शिंदे गटात असून भाजपामध्ये असल्यासाऱखं वागतात, असा चिमटा त्यांनी काढला.