Vande Bharat : जूनपासून २८ राज्यांमध्ये धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई- गोवा कधी सुरु होणार

| Updated on: May 27, 2023 | 2:42 PM

Vande Bharat Express : रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्रातून लवकरच चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. जून महिन्यात ती सुरु होणार आहे. तसेच २८ राज्यातून वंदे भारत एक्स्प्रेस जून महिन्यापासून धावणार आहे.

Vande Bharat : जूनपासून २८ राज्यांमध्ये धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई- गोवा कधी सुरु होणार
vande-bharat-express
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस देशभरात अनेक मार्गावरुन धावू लागली आहे. या गाडीची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. यामुळे अनेक ठिकाणी ती सुरु करण्याची मागणी केली जात आहे. आता महाराष्ट्रातून लवकरच चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली. तसेच मुंबईवरुन शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. आता चौथी गाडी मुंबई-गोवा सुरु होणार आहे.

आसाममध्ये सुरु होणार

स्वदेशी तंत्रज्ञानाने बनलेली सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस सध्या २१ राज्यांमधून धावत आहे. बिहार, झारखंड अन् गोव्यामधून ती धावत नाही. सरकारने जून महिन्यात देशातील २८ राज्यांमधून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याचे म्हटले आहे. पूर्वीकडील राज्यांमध्ये अजून विद्युतीकरण झाले नाही. त्यामुळे त्याठिकाणांवरुन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होऊ शकत नाही. परंतु आसाममधून पुढील आठवड्यात वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

पहिली कुठे झाली होती सुरु

पहिली वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली होती. त्यानंतर दिल्ली ते जम्मू सुरु झाली होती. सध्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर, गुजरात, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशसह दक्षिण भारतातून ही रेल्वे धावत आहे. देशातील 21 राज्यांमधून तिचा प्रवास सुरु आहे.

मुंबई गोवा कधी होणार सुरु

कोकण रेल्वे मार्गावरून १६ मे रोजी वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन यशस्वी झाली. मुंबईवरुन गोव्यासाठी १६ डब्यांची एक्स्प्रेस सुसाट धावली. आता ही गाडी जून महिन्यात सुरु होणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. तेजस एक्स्प्रेसपेक्षाही कमी वेळ या गाडीने घेतला होता.

 

मुंबई ते गांधीनगर ट्रेन

  • मुंबई सेंट्रेलवरुन सकाळी 6:00 वाजता सुटेल आणि गांधीनगरला 12:25 वाजता पोहचणार आहे.
  • गांधीनगरवरुन दुपारी 2:05 वाजता सुटेल तर मुंबईत रात्री 8:25 ला पोहचणार आहे.
  • मुंबई ते गांधीनगर अंतर : 522 km

 

मुंबई ते गांधीनगर भाडे

  • AC Chair car (CC) : 1255
  • Exec. Chair Car (EC) : 2435
  • गांधीनगर ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1420
  • Exec. Chair Car (EC) : 2630

मुंबई ते सोलापूर वंदे भारत

  • मुंबईवरुन दुपारी 4.05 वाजता सुटते तर सोलापूरला रात्री 10.40 वाजता पोहचते. पुण्यात ही गाडी संध्याकाळी 7.10 मिनिटांनी पोहचते.
  • सोलापूरवरुन सकाळी 6:05 वाजता सुटते तर मुंबईत दुपारी 12:35 वाजता पोहचते. पुण्यात ही गाडी सकाळी 9:15 वाजता येते.
  • मुंबई ते सोलापूर अंतर 455

 

 

मुंबई ते सोलापूर भाडे

  • AC Chair car (CC) : 1255
  • Exec. Chair Car (EC) : 2435
  • सोलापूर ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1150
  • Exec. Chair Car (EC) : 2185

मुंबई ते साईनगर (शिर्डी)

  • मुंबईवरुन सकाळी 6:20 वाजता सुटते, शिर्डीला 11:40 वाजता पोहचते.
  • शिर्डीवरुन संध्याकाळी 5:25 वाजता सुटते आणि मुंबईला रात्री 10:50 वाजता पोहचते.
  • मुंबई ते शिर्डी अंतर 343

 

  • मुंबई ते शिर्डी भाडे
  • AC Chair car (CC) : 975
  • Exec. Chair Car (EC) : 1840
  • शिर्डी ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1130
  • Exec. Chair Car (EC) : 2020