Vegetable Price : मुंबईमध्ये भाज्यांचे दर गगनाला, भेंडी आणि गवारने शंभरी गाठली!

| Updated on: Dec 21, 2021 | 12:57 PM

मुंबईमध्ये भाजीचे दर गगनाला गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील भाजी मंडईमध्ये भाज्यांच्या दरांमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे. भेंडी, गवारने जवळपास शंभरी गाठली आहे. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे ही भाववाढ झालेली आहे, अशी माहिती भाजीविक्रेत्यांनी दिली आहे.

Vegetable Price : मुंबईमध्ये भाज्यांचे दर गगनाला, भेंडी आणि गवारने शंभरी गाठली!
भाजीपाला
Follow us on

अक्षय मंकणी, टीव्ही९ मराठी, मुंबई – मुंबईमध्ये भाजीचे दर (Vegetable Price) गगनाला गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील भाजी मंडईमध्ये भाज्यांच्या दरांमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे. भेंडी, गवारने जवळपास शंभरी गाठली आहे. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे ही भाववाढ झालेली आहे, अशी माहिती भाजीविक्रेत्यांनी दिली आहे.

या संपूर्ण भाववाढीचा परिणाम भाजी व्यवसायावरती होत असल्याने खूप मोठा तोटा भाजी विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. भाज्यांचे दर वाढल्यामुळे ग्राहक महाग भाज्या घेणे टाळत आहेत. त्यामध्येही भेंडी आणि गवार यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याने ग्राहक भेंडी आणि गवार खरेदी करणे टाळत आहेत.

या भाज्यांच्या दरामध्ये झालीय वाढ

भेंडीची किंमत 100 रुपये किलोपर्यंत गेली आहे. गवार 100 रुपये किलोने मिळत आहे. कारले हे पूर्वी 40 रुपये किलो होते, पण आता त्याचे दर हे 60 रुपये किलो मिळत आहेत वाटाणा मुंबईच्या बाजारामध्ये 40 किलो मिळतो आहे. गाजर देखील गाजर 40 किलो आहेत.

पालक, मेथी दर

पालक 20 जुडी आहे तर मेथीची एक जुडी 30 रूपये आहे. टमाटे 30 किलो आहेत. प्रत्येक भाज्यांमागे भाव वाढला आहे. वाशी येथील एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात आवक कमी झाल्याने दर कडाडले आहेत. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या जास्त दराने विकल्या जात आहेत.

संबंधित बातम्या : 

Mumbai Water Taxi: नव्या वर्षात मुंबईकरांना गिफ्ट, जानेवारी पंतप्रधानांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन!

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात उभी फूट! अजय गुजर प्रणित संघटनेची संप मागे घेतल्याची घोषणा