मुंबई : राज्यामध्ये कोरोनाचा संसर्गं वाढत आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने राज्यात शिरकाव केला आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांकडून सर्रासपणे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. असाच प्रकार दादरच्या भाजी मंडईमधून समोर आला आहे. भाजी मंडई परिसरात ग्राहक मोठी गर्दी करत असून, कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे दादरच्या भाजीमंडईत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे. खरेदीसाठी आलेल्या अनेक ग्राहकांनी तसेच व्यापाऱ्यांनी देखील मास्क घातलेला नाही. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यामध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील राज्यात शिरकाव केला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते पहाटे 6 पर्यंत पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असताना देखील अनेक ठिकाणी जमावबंदीचे उल्लंघन होताना दिसून येत आहे.
Anil Deshmukh : अनिल देशमुख प्रकरणी ईडीकडून वेगवान तपास, 12 बड्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी
Temperature Update : राज्यभर थंडीचा कडाका वाढला; मुंबईसह सर्वत्र पारा घसरला
Mumbai | नाताळदिनी मुंबईत शून्य कोविड बळी, डिसेंबर महिन्यात सहाव्यांदा असं घडतंय!