Passenger Seat Jugaad in Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये नेहमी प्रचंड गर्दी असते. या गर्दीत लोकलमध्ये प्रवेश करणे मोठे दिव्य असते. लोकलचा तास, दोन तासांचा प्रवास अनेक वेळा उभे राहून करावा लागतो. सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खचाखच गर्दीत जागा न मिळालेल्या व्यक्तीने अनोखा जुगाड केला आहे. हा जुगाड पाहून नेटकरी खूश झाले आहे. अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, यापेक्षा आरामदायक प्रवास काय असणार?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक व्यक्ती आपली बॅग उघडतो. त्यानंतर बॅगमधून एक छोटा पोर्टेबल स्टूल काढतो. मग दोन सीटांमध्ये असलेल्या जागेत तो स्टूल ठेऊन आरामात बसतो. हा सर्व प्रकार कॅमेरासमोर चांगली पोज देऊन तो करतो. हा स्टूल तो नेहमी सोबत ठेवता. ज्यावेळी सीट मिळत नाही, तेव्हा त्याचा वापर करतो. त्या व्यक्तीचा हा जुगाड पाहून नेटकरी खूश झाले आहेत.
इंस्टाग्रामवर borivali_churchgate_bhajan अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याला चार मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. लाखोंच्या संख्येने लोकांनी लाईक केले आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणतो, विंडो सीट प्रो मॅक्स. दुसरे यूजर म्हणतो, आता मुंबई लोकलमध्ये लोक असाच जुगाड करतील. आणखी एक व्यक्ती म्हणतो, लोकलचा सीटपेक्षा जास्त आरामदायक हा प्रवास झाला आहे.
मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ याआधीही व्हायरल झाला होता. त्यामध्ये असाच जुगाड त्या व्हिडिओत दिसत होता. गेल्या आठवड्यात हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक व्यक्ती गर्दीच्या ट्रेनमध्ये दोन बर्थच्यामध्ये स्विंग सारखी सीट बनवण्यासाठी दोरी बांधताना दिसत होता. मुंबई लोकलमधील हा प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.