मुंबई: कोरोनाच्या मागच्या लाटेत मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे हॉटस्पॉट होते. पुण्यात तर परिस्थिती पूर्वपदावर यायला बराच वेळ लागला होता. अजूनही पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात नाही. त्यामुळे पुणेकरांनी थोडी कळ सोसायला हवी, असं आवाहन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. (vijay wadettiwar reaction on lockdown relaxation in pune)
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं. काही निर्बंध कडक करावे लागतात. मागच्या लाटेत पुणे, ठाणे, नागपूर आणि मुंबई हे हॉटस्पॉट होते. पुण्याची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी बराच काळ लागला होता. पुण्यात कोरोनाचा स्प्रेड व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे पुणेकरांना काही काळ थोडीशी कळ सोचावी लागेल. त्यांनाही शिथिलता देऊ, असं वडेट्टीवार म्हणाले.
तिसरी लाट मोठी असेल असं भाकीत आहे. तसेच आताची स्थितीही सर्वकाही सुरू करावं अशी नाही. त्यामुळे मोठ्या शहरात शिथिलता देताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. याबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असं ते म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी मुंबई लोकलबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना आटोक्यात आलेला नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आज नवे कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. या नियमावलीमध्ये पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आलाय. तिसऱ्या लेव्हलमधील नियमांनुसार येथे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील.
ज्या शहरांत किंवा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दर कमी आहे तिथे राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. त्यानुसार आता हॉटेल, स्पा, जीम, सलून सगळं काही नियम आणि अटींनुसार सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?, असा सवाल करत लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा, अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले (Tushar bhosale) यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. मात्र आता सगळं काही सुरु झालेलं असताना, शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिलेली असताना मंदिरं उघडण्याचा निर्णय देतीख सरकारने घ्यावा, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे. (vijay wadettiwar reaction on lockdown relaxation in pune)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 August 2021 https://t.co/8K63KbGSd2 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 3, 2021
संबंधित बातम्या:
राज्याची चिंता वाढवणारी बातमी, पुण्यातील ‘या’ गावात डेल्टा प्लसचे 2 रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट
पुण्यात तिसऱ्या लेव्हलचे कोरोना नियम, व्यापारी आक्रमक, “नियम बदला अन्यथा रस्त्यावर उतरणार”
तुळशीबाग मार्केटमध्ये पुणेकरांची तुफान गर्दी, कोरोना नियमांना हरताळ
(vijay wadettiwar reaction on lockdown relaxation in pune)