अग्निशमन दल पदभरती वशिल्याचं आधीच ठरलं होतं का?; संजना घाडी यांचा सवाल

| Updated on: Feb 04, 2023 | 4:28 PM

भरती रद्द झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. आम्ही आताचं रस्त्यावर आले आहोत. १.६२ इंचीपेक्षा जास्त उंची असलेल्या तरुणींना तुम्ही बाहेर का काढलं याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, असंही संजना घाडी यांनी म्हंटलं.

अग्निशमन दल पदभरती वशिल्याचं आधीच ठरलं होतं का?; संजना घाडी यांचा सवाल
संजना घाडी
Follow us on

मुंबई : अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) महिला भरतीत प्रचंड गोंधळ उडाला. संतापलेल्या तरुणींनी मैदानातचं जोरदार आंदोलन केले. तरुणींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांनी तरुणींवर सौम्य लाठीचार्ज केला. यामुळं येथील वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी (Sanjana Ghadi) तिथं आल्या. यावेळी बोलताना संजना घाडी म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे मैदानावर २१० महिला पदासाठी अग्निशमन दलाची भरती सुरू आहे. प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे. प्रशासन म्हणतं, ८ वाजतापूर्वी आलेल्या सर्व तरुणींना त्यांनी आत घेतलं. शिवाय १.६२ इंच उंची असलेल्या तरुणींना आतमध्ये घेतलं.

नांदेड, लातूर येथून काही तरुणी आल्या आहेत. त्या कालपासून येथे राहायला आहेत. पण, गर्दीत काही तरुणींना शिरता आलं नाही. ही भरती दोन-तीन टप्प्यात का झाली नाही, असा सवाल संजना घाडी यांनी विचारला.

रिजेक्ट करण्याचं कारण काय?

ग्रामीण भागातून तरुणी आशेने आल्या आहेत. त्यांची या गर्दीत प्रतारणा झाली. रिजेक्टेटचे स्टँप असलेल्या तरुणींची उंची ही १.६२ इंचीच्या पुढे आहे. मग, यांना रिजेक्ट करण्याचं कारण काय. पायावर पाय मारून मान खाली करून त्यांची उंची मोजली जात असल्याचा आरोपी काही तरुणींनी केला.

याच्यात काय गौडबंगाल आहे. २१० तरुणींची भरती आधीच ठरली होती का. असेच धंदे करायचे असतील, तर राज्यातील तरुणींची प्रतारणा तुम्ही थांबविली पाहिजे, असंही संजना घाडी यांनी सांगितलं.

प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

हा अन्याय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सहन करणार नाही. यांच्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. ही भरती प्रक्रिया रद्द करावी. अशी विनंती आयुक्त चहल आणि अग्निशमन दलाच्या प्रमुखांना करत असल्याचंही संजना घाडी म्हणाल्या.

कोणत्याही परिस्थितीत ही भरती रद्द झाली पाहिजे. कारण रिजेक्टेडचा शिक्का मारलेल्या मुलींची उंची ही १.६२ पेक्षा जास्त आहे. मग, त्या रिजेक्टेड कशा अशी टीका संजना घाडी यांनी केली. आठ वाजतापूर्वी आतमध्ये गेलेल्या तरुणींच्या हातावर रिजेक्टेडचे शिक्के का आहेत, असा सवालही त्यांनी केला.

भरती रद्द झाली नाही. तर आम्ही रस्त्यावर उतरू. आम्ही आताचं रस्त्यावर आले आहोत. १.६२ इंचीपेक्षा जास्त उंची असलेल्या तरुणींना तुम्ही बाहेर का काढलं याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, असंही संजना घाडी यांनी म्हंटलं.