हजारोंचा जमाव गोळा करून सोमय्यांसोबत घातपातीचा डाव नव्हता ना? प्रकरणाची चौकशी व्हावी; दरेकरांची मागणी

| Updated on: Sep 20, 2021 | 5:19 PM

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये नमुद केले की, किरीट सोमय्या यांच्या जीवाला धोका आहे, मग कोल्हापूरमध्ये जमाव निर्माण करून सोमय्या यांच्या जीवाला काही घातपात करण्याचा तर कट नव्हता ना? असा संशय प्रविण दरेकरांनी व्यक्त केला आहे.

हजारोंचा जमाव गोळा करून सोमय्यांसोबत घातपातीचा डाव नव्हता ना? प्रकरणाची चौकशी व्हावी; दरेकरांची मागणी
pravin-darekar
Follow us on

मुंबई : कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये नमुद केले की, किरीट सोमय्या यांच्या जीवाला धोका आहे, मग कोल्हापूरमध्ये जमाव निर्माण करून सोमय्या यांच्या जीवाला काही घातपात करण्याचा तर कट नव्हता ना? असा संशय निर्माण होत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी व्यक्त आज पत्रकार परिषदेत केली आहे. (Wasn’t there a plot to assassinate Kirit Somaiya? matter should be investigated : Pravin Darekar)

प्रविण दरेकर म्हणाले की, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी असंही म्हंटलं आहे की, अशा प्रकारच्या कारवाईबद्दल मुख्यमंत्र्यांना कळवले जाते. गृहमंत्री सांगतात की, जिल्हाधिकारी स्तरावरची ही कारवाई आहे, त्यामुळे आम्हाला कळवले नव्हते. तर शिवसेना खासदार संजय राऊत एका बाजूला बोलतात की, मुख्यमंत्री कार्यालयाला यासंदर्भात काही माहिती नव्हती. मुख्यमंत्र्यांचा या सर्वांशी काही संबंध नाही, गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे या दोन्ही पक्षात किती आलबेल आहे हे उघड झाल्याचे होतंय.

दरेकर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपची कशी घोडदौड चालू आहे हे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यांनी हसन मुश्रीफ यांना आव्हान दिले आहे. सर्व बाबतीत कायदेशीर लढाई लढायला आम्ही पण तयार आहोत. कर नाही तर डर कशाला. भारतीय जनता पार्टीने त्यांची प्रकरणे काढली म्हणून आता आमच्या पक्षांच्या नेत्याचे खोदकाम सुरू आहे. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवावे, कितीही खोदकाम केले तरी भारतीय जनता पक्षाची प्रकरणे सापडणार नाहीत, कर नसेल तर डर असायचं कारण नाही. त्यामुळे भाजप अशा प्रकारच्या धमक्यांना भीक घालत नाही.

खासदार भावना गवळी यांच्या विषयचीच्या प्रकरणाविषयी सोमय्या वाशिमला गेले होते. अनिल परब यांच्या संदर्भातही ते रत्नागिरी येथे गेले होते. दोन्ही ठिकाणी सुरळीत जाऊन आले मग कोल्हापुरात नेमके काय आहे की, मुश्रीफ यांना हजारोंचा समुदाय रस्त्यावर उतरवावा लागला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या ऑर्डरमध्ये सोमय्या यांच्या जीविताला धोका असल्याचे का नमूद केले आहे? असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला.

इतर बातम्या

किरीट सोमय्यांकडून आरोपांच्या फैरी, अजित पवारांनी एका वाक्यात निकाल लावला!

आता महाविकास आघाडीही वात पेटवणार, फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार; नाना पटोलेंचा इशारा

VIDEO: मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही, राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया, सोमय्यांवरील कारवाईवर आघाडीत मतभेद?

(Wasn’t there a plot to assassinate Kirit Somaiya? matter should be investigated : Pravin Darekar)