राज्यात मुख्यमंत्री पदावरून राजकारण तापलेलं असताना थंडीने मार्केट जाम केलं आहे. अवघा उभा-आडवा महाराष्ट्र थंडीच्या पट्ट्यात आला आहे. थंडीने मार्केट जाम केले आहे. महाराष्ट्र गारठला आहे. गावापासून ते शहरापर्यंत थंड हवेमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा अंमल होताच पण आता दिवसासुद्धा बोचरी, गुलाबी थंडी प्रत्येकाला जाणवणार आहे. आता गेल्या आठ महिन्यांपासून अडगळीत पडलेल्या स्वेटरला आता भाव आला आहे. तर काही जणांनी ऊबदार कपड्यांसाठी बाजारपेठ जवळ केली आहे. यंदा गारठा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
थंडीचा कडाका वाढला
राज्यात थंडीचा कडाका वाढला. बंगालच्या उपसागरावरील वादळी वाऱ्यांनी थंडीचा खलिता पाठवला आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींनी गारठ्याचे प्रमाण वाढवले आहे. बोचरी थंडी जाणवत असल्याने शुष्क, कोरडेपणा वाढत आहे. काहींना अंगाला खाज जाणवत आहे. या सर्व हवामान घडामोडींमुळे अनेकांचा वीकेंड एकतर उबदार कपड्यात अथवा पर्यटन स्थळी जाण्याची शक्यता आहे. या काळात हाडं गोठवणारी थंडी जाणवली तर आश्चर्य वाटू देऊ नका.
निफाड निच्चांकी, थंडीची लाट कायम
राज्यात गुरूवारी निफाडमध्ये सर्वाधिक पार घसरला. या परिसरात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. या परिसरात पारा 6 अंशांपर्यंत घसरला. तर इतर जिल्ह्यातही तापमान कमालीचे घटले. महाबळेश्वर आणि इतर थंडीच्या ठिकाणांपेक्षा राज्यातील काही भागात थंडीचा कडाका जाणवला. राज्यात काही दिवस अजून थंडीची लाट कायम राहणार असल्याचे समजते. राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर यलो अलर्ट कायम आहे.
Rainfall Warning : 29th November 2024
वर्षा की चेतावनी : 29th नवंबर 2024Press Release Link (28-11-2024): https://t.co/uxCd7oup4j#rainfallwarning #IMDWeatherUpdate #stayalert #staysafe #TamilNadu #andhrapradesh #kerala #karnataka @moesgoi @ndmaindia @DDNational… pic.twitter.com/QSeLCF9X64
— India Meteorological Department (@Indiametdept) November 28, 2024
तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळ
दक्षिणेकडील राज्यात चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत झाले. तामिळनाडू, कराईकल, पुद्दुचेरी यासह आंध्र प्रदेशाच्या किनार पट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर रायलसीमामध्ये सुद्धा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर भारतात थंडीचा कहर असून दाट धुके असेल. या सर्व घडामोडींमुळे राज्यात थंडीचा जोर कायम असण्याची शक्यता आहे.