राज्यात येत्या २५ जुलैपासून ओबीसी, एससी आणि एसटी यांच्या हक्कांसाठी आरक्षण बचाव यात्रा काढण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ही यात्रा दादर चैत्यभूमीपासून निघणार असून संभाजीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे. या आरक्षण बचाव यात्रेच्या मागण्या नेमक्या काय असणार आहेत जाणून घ्या.
ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे. एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप डबल करावी. केंद्राची स्कॉलरशीप मिळते, राज्याचा हिस्सा नाही. ओबीसीच्या विद्यार्थ्यांनाही एससी एसटीची स्कॉलरशीप लागू करा. घाईगडबडीत फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट तो घाईगडबडीत दिला आहे. तो रद्द करावा, जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच. कारण ते ओबीसीत आहेत. शेवटी आरक्षण जे आहे, त्यात एससी एसटीला पदोन्नती तसेच ओबीसींनाही पदोन्नती मिळाली पाहिजे. या मार्चमध्ये आम्ही रयतेतील गरीब मराठ्यांना अपील करणार आहोत की, श्रीमंत मराठा तुम्हाला आतापर्यंत फसवत आला आहे. टिकाऊ आरक्षण दिलं नाही. तेव्हा ओबीसींच्या आरक्षणवाद्यांच्या हातात सत्ता द्या, त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट, टिकाऊ ताट, वेगळं आणि स्थायी करून देणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आमचा हेतू हा आहे की जी स्फोटक परिस्थिती झाली आहे. ती चिघळू नये. शांतता राहिली पाहिजे. ओबीसी संघटना आणि वंचित आघाडी यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. परंतू इतर राजकीय पक्षा आहेत, भाजप, काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाहीत. या यात्रेतून एक दबाव यांनीही भूमिका घ्याव्यात त्यामुळे ही स्फोटक परिस्थिती निवळण्यात येईल. पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्ववत होईल, अशी आशा आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांनी बाहेर पडावं- प्रकाश आंबेडकर
आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आहे. स्वबळावर लढणार. अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत, असं म्हणत आहे. वंचितकडे जातो असं सांगत आहेत. आम्हाला थांबवायचं असेल तर सीट वाढवा असं सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावं त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी अजित पवारांना ऑफर दिली आहे.